नवी दिल्ली : भारतावर अमेरिकेने 200 वर्षे राज्य केल्याचा अजब दावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते तिरथ सिंह रावत यांनी केलाय. एका भाषणात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. विशेष म्हणजे भाषण संपेपर्यंत आपण काही चुकीचं सांगितल्याचे भावही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवले नाही. खरंतर ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलेलं असताना रावत यांनी अमेरिकेने राज्य केल्याचं विधान केल्यानं त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. विशेष म्हणजे रावत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेकदा वादग्रस्त विधानं केलीत. याआधी त्यांनी फाटलेल्या जिन्सवरुन केलेल्या वक्तव्यावरही जोरदार टीका झाली होती (Uttarakhand CM Tirath Singh Rawat claim America enslaved us for 200 years).
तिरथ सिंह रावत म्हणाले, “आपण अमेरिकेचे 200 वर्षे गुलाम होतो. संपूर्ण जगात अमेरिकेचं साम्राज्य होतं. त्यांच्या साम्राज्यावरी सूर्य कधीच मावळत नव्हता असंही सांगितलं जायचं. मात्र, कोरोना काळात त्यांची स्थिती वाईट झाली. पावणे तीन लाखांपर्यंत तेथील मृत्यूदर पोहचला. अगदी कमी लोकसंख्या असलेला आणि आरोग्यात क्रमांक एकवर असलेल्या देशाचा मृत्यूदर 50 लाखापेक्षा जास्त झाला. आजही येथील स्थिती बिकट आहे. हा देश पुन्हा लॉकडाऊनकडे प्रवास करत आहे.”
#WATCH “…As opposed to other countries, India is doing better in terms of handling #COVID19 crisis. America, who enslaved us for 200 years and ruled the world, is struggling in current times,” says Uttarakhand CM Tirath Singh Rawat pic.twitter.com/gHa9n33W2O
— ANI (@ANI) March 21, 2021
‘मोदींच्या जागेवर इतर कुणाचं नेतृत्व असतं तर भारताची कशी अवस्था झाली असती माहिती नाही’
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आस जागवली. त्यांच्या जागेवर इतर कुणाचं नेतृत्व असतं तर भारताची कशी अवस्था झाली असती माहिती नाही. देशाची स्थिती वाईट झाली असती, पण मोदींनी आपल्याला मदत देण्याचं काम केलं. भारत 130-35 कोटी लोकसंख्येचा देश आहे. असं असलं तरी कोरोना काळात इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती दिलासादायक आहे,” असं मत रावत यांनी व्यक्त केलं.
“आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला वाचवण्याचं काम तर केलंच आहे, पण आपणही नियमांचं पालन केलं. जेव्हा मोदींनी म्हटलं की मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, हात वारंवार धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, तेव्हा लोकांनी हे सर्व केलं. त्यामुळेच आज भारताची स्थिती चांगली आहे,” असाही दावा तिरथ सिंह रावत यांनी केला.
हेही वाचा :
जीन्सप्रकरण भोवले, अखेर मुख्यमंत्री रावत यांची माफी; म्हणाले…
मोदींचा हाफ चड्डीतला फोटो शेअर करत प्रियंका गांधींचे भाजप नेत्यांना चिमटे
व्हिडीओ पाहा :