नवी दिल्ली : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये (UttarKashi) भीषण बस अपघात झालाय. उत्तरकाशीमध्ये डामटा ते नौगांवदरम्यान खड्ड जवळ एक प्रवासी बस 500 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बस अपघाताची (Bus Accident) माहिती मिळताच जिल्हा पंचायत सदस्य हाकम सिंह रावत यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलीस आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार बस यमुनोत्रीकडे (Yamunotri) जात होती. चालकाचा ताबा सुटल्यानंतर बस डामटा आणि नौगावमधील खड्ड जवळ एका दरीत कोसळली. बस जवळपास 500 मीटर खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळतेय. या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी होते. त्यातील 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
#Update | Uttarakhand: 15 bodies have been recovered so far after a bus carrying 28 pilgrims fell into a gorge near Damta in Uttarkashi district: DGP Ashok Kumar
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 5, 2022
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील 28 यात्रेकरुंना घेऊन एक बस उत्तरकाशीला जात होती. ही बस डामटाजवळ दरीत कोसळली आहे. अनेक मृतदेह सापडले असून 6 जणांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळावर दाखल झाली आहे, अशी माहिती डीजीपी अशोक कुमार यांच्याकडून देण्यात आलीय.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. जखमींना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एनडीआरएफही लवकरच घटनास्थळावर पोहोचत आहे, अशी माहिती शाह यांनी ट्विटरद्वारे दिलीय.
उत्तराखंड में श्रद्धालुओं की बस के खाई में गिरने की सूचना अत्यंत दुःखद है। इस पर मैंने मुख्यमंत्री @pushkardhami जी से बात की है। स्थानीय प्रशासन व SDRF की टीमें बचाव कार्य में लगी हैं और घायलों को उपचार के लिए नजदीकी अस्पताल ले जाया जा रहा है। NDRF भी शीघ्र वहाँ पहुँच रही है।
— Amit Shah (@AmitShah) June 5, 2022