1.29 लाखात रशियात फिरुन या आणि स्पुटनिक लसही घ्या; भारतीयांसाठी ट्रॅव्हल्स कंपनीचे भन्नाट पॅकेज

| Updated on: May 20, 2021 | 8:57 AM

भारतातील अनेक लोक या पॅकेजसाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. 29 मे रोजी पहिली टूर रशियाला रवाना होणार आहे. | Vaccine Tourism russia trip

1.29 लाखात रशियात फिरुन या आणि स्पुटनिक लसही घ्या; भारतीयांसाठी ट्रॅव्हल्स कंपनीचे भन्नाट पॅकेज
व्हॅक्सीन टुरिझम
Follow us on

नवी दिल्ली: काहीजण संकटातही असलेली संधी कशाप्रकारे शोधतात, याचा उत्तम नमुना सध्या पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असताना आता दुबईतील एका ट्रॅव्हल्स कंपनीने भन्नाट शक्कल शोधून काढली आहे. या ट्रॅव्हल्स कंपनीकडून पर्यटकांना रशियात फिरण्याची आणि लस (Covid vaccine) घेण्यासाठी खास पॅकेज तयार करण्यात आले आहे. व्हॅक्सिन टुरिझमची ही संकल्पना सध्या प्रचंड चर्चेत आहे. (Russia trip for Rs 1.29 lakh with 2 Sputnik V jabs dose vaccine tourism kicks off)

या कंपनीने भारतीयांसाठीही खास पॅकेज तयार केले आहे. त्यामध्ये दिल्ली ते मॉस्को असा 24 दिवसांचा दौरा आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला रशियामध्ये नेले जाईल आणि त्याठिकाणी स्पुटनिक व्ही या कोरोना लसीचे दोन डोसही घेता येतील. त्यानंतर तुम्हाला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्रही दिले जाईल. स्पुटनिक लसीच्या दोन डोसमध्ये 20 दिवसांचे अंतर असावे लागते. त्यामुळे या काळात पर्यटकांना रशियात फिरताही येईल. 24 दिवसांच्या या दिल्ली-मॉस्को टुरसाठी ही कंपनी 1.29 लाख रुपये आकारत आहे.

‘इंडिया टुडे’ वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्रॅव्हल्स कंपनीशी संपर्क साधला. तेव्हा भारतातील अनेक लोक या पॅकेजसाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. 29 मे रोजी पहिली टूर रशियाला रवाना होणार आहे. यामध्ये 28 पर्यटकांचा समावेश आहे. तर त्यापुढील टुर्स या 7 जून आणि 15 जूनला रवाना होतील. या पॅकेजला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सर्व टुर्स वेगाने बूक होत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

व्हॅक्सिन पॅकेजमध्ये काय-काय असेल?

व्हॅक्सिन पॅकेजमध्ये दिल्लीवरुन हवाई प्रवासाचे तिकिट, ब्रेकफास्ट, डिनर आणि पर्यटनस्थळांच्या भ्रमंतीचा समावेश आहे. सध्या जगामध्ये रशिया हा एकमेव देश आहे. जिथे भारतीय नागरिक लसीकरण पर्यटनासाठी जाऊ शकतात. रशियात जाण्यासाठी केवळ R- PCR चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असण्याची अट आहे. रशियात गेल्यानंतरही क्वारंटाईन होण्याची सक्ती करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या:

Special Report | 995 रुपयांना ‘स्पुटनिक’चा डोस! स्पुटनिक लस किती प्रभावी?

कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस, स्तनपान करणाऱ्या महिलाही लस घेऊ शकतात, नव्या गाईडलाईन्स जारी

एका ऐवजी दहा कंपन्याना कोरोना व्हॅक्सिन बनविण्याचं लायसन्स द्या; नितीन गडकरींचा सल्ला

(Russia trip for Rs 1.29 lakh with 2 Sputnik V jabs dose vaccine tourism kicks off)