दिल्ली : आजचा ‘व्हेलेंटाईन डे’ जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. भारत- पाकिस्तान फाळणीच्या कहानीचे व्हीलन असलेले आणि पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना आणि सोळा वर्षीय रतनबाईची ‘लव्ह स्टोरी’ खूप प्रसिद्ध होती. जिना यांनी भारताशी दुश्मनी घेतली असली तरी त्यांनी ही त्यांच्या जीवनात प्रेम केले होते. आणि एक वेळ अशी आली की त्यांच्या लव्हस्टोरीत तेच व्हीलन ठरले आणि यासाठी त्यांना नेहमीच पश्चाताप होईल.
ही आहे जिना आणि रतनबाईची प्रेम कहानी
साल 1892 मध्ये 15 वर्षांचे असताना त्यांचा विवाह 14 वर्षांच्या इमीबाई हीच्याशी झाला. परंतू वर्षभरानंतर ते लगेच अभ्यासासाठी लंडनला गेले, तेथे ते 1896 पर्यंत राहीले. इमीबाईचे कॉलराने निधन झाल्याने त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांची ओळख एका पारसी तरूणीशी झाली तिचे नाव रतनबाई पेटीट होते. तिला रती नावाने ओळखले जायचे. त्यांचे मित्र दिनशॉ यांच्या आमंत्रणावरून ते एकदा दार्जिलिंगला गेले होते, तेव्हा त्यांची भेट दिनशॉ यांच्या सोळा वर्षांच्या रतनबाई उर्फ रती या मुलीशी झाली होती. ती मुंबईच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची एकुलती एक मुलगी होती.
रती खूपच वेगळ्या स्वभावाची होती तिला तिच्या वयाच्या मित्रांसोबत फिरण्याऐवजी मोठ्या व्यक्तींबरोबर राजकीय विषयांवर चर्चा करायला आवडायचे. त्यामुळे दोघांचे सूर जुळले. ती जिना यांना जे. म्हणून हाक मारायची. जिना यांनाही रती हीचे सौदर्य आणि बुद्धीमत्ता आवडत होती. त्यामुळे चाळीसीचे जिना पुन्हा बोहल्यावर चढायला आतूर झाले. त्याने रती हीचा हात मित्राकडे मागितला तेव्हा दिनशॉ त्यांच्यावर भडकले आणि त्यांना येथून चालता हो म्हणाले.
रती तरीही जिनाच्या संपर्कात होती. त्यानंतर दिनशॉ यांनी रती अल्पवयीन असल्याने जीना तिच्याशी संपर्क करू शकत नाहीत अशी कोर्टातून ऑर्डर मिळविली, परंतू बंडखोर रती हीने पित्याच्या या ऑर्डरला धु़डकावले. ती त्यांच्याशी संपर्कात राहू इच्छीत होती, परंतू जिना यांनी स्वत: चे तिच्याशी संपर्क तोडीत सलग 18 महिने तिच्याशी कोणताही संपर्क केला नाही.
त्यानंतर 20फेब्रुवारी 1918ला ती अठरा वर्षांची झाल्यावर तिने पुन्हा जीना यांना भेटणे सुरू केले. 18 एप्रिल तिने आपले घर सोडत इस्लाम धर्म स्विकारत जिनाही विवाह केला, रती हीने पारसी धर्म सोडून इस्लाम कबुल केल्याने देशभर वादंग निर्माण झाला.
या दोघांची प्रेमकहानी भरात आली. तिच्यामुळे जीना यांनी क्लबमध्ये जाणे बंद केले. रतीला महागडे कपडे आणि घर सजविण्याची आवड होती, जीना फालतू खर्च करण्याच्या विरोधात होते. परंतू रतीसाठी पैसा खर्च करण्यास त्यांना काही हरकत नव्हती. काही लोकांच्या मते रतीच्या राष्ट्रवादामुळे जीनांमध्ये अतिरेकी राष्ट्रवाद निर्माण झाला. 14 ऑगस्ट 1919ला जिन्ना आणि रती यांना कन्यारत्न झाले. 1921 नंतर मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनात खटके उडणे सुरू झाले. राजकीय प्रवासात हिंदू आणि मुसलमान हे दोघेही जीनांना टाळू लागले. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला.
डिसेंबर 1927 च्या मुस्लीम लीगच्या कोलकाता अधिवेशनाला त्यांच्या सोबत गेलेली, परंतू येताना रती घरात येण्याऐवजी सरळ ताज हॉटेलात गेली. त्यानंतर तिची तिची तब्येत बिघडल्याने ती एप्रिल 1928 मध्ये आपल्या आईसोबत पॅरीसला गेली. ज्यावेळी जीना यांना समजले तेव्हा तेही दौरासोडून पॅरीसला तिच्याजवळ गेले आणि तिची काळजी घेऊ लागले. त्यानंतर ते कॅनडा येथे जाणार होते, परंतू अचानक ती मुंबईला गेली आणि तिथे ताजमध्ये राहू लागली, तेथे ती पुन्हा आजारी पडली. त्यानंतर जीना मुंबईला आल्यावर तिला ताजमध्ये जाऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस करू लागले.
28 जानेवारी 1929 ला जीना विधानसभेच्या बजेट सत्रात भाग घेण्यासाठी दिल्लीला गेले. 18 फेब्रुवारीला रती कोमात गेली, आणि 20 फेब्रुवारीला तिचे निधन झाले. त्याच दिवशी तिचा 29 वा वाढदिवस होता. जीनांना ही बातमी त्यांच्या सासऱ्याने दिली. रतीला दफन करताना तिच्या मृतदेहावर ज्यावेळी जिनाना माती टाकण्यास सांगितले तेव्हा ते खूप जोराने रडले, असे जिना यांचे सचिव असलेले आणि नंतर स्वतंत्र भारताचे विदेश मंत्री झालेल्या मोहम्मद करीम छागला यांनी आपली आत्मकथा ‘रोजेज इन दिसंबर’ यात लिहीले आहे.