बैलाच्या शक्तीपुढे ‘वंदे भारत’ची पॉवर ढुस्स, बैलाच्या प्रचंड धडकेने ट्रेनचा पुढला भागच झाला डॅमेज

| Updated on: May 20, 2023 | 1:42 PM

Vande Bharat Express Accident : वंदे भारत ट्रेनची एका बैलाला धडक बसली. त्यामुळे रेल्वेच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर ट्रेन सुमारे 15 मिनिटे उभी होती. बैल ट्रेनसमोर येताच पायलटने इमर्जन्सी ब्रेकही लावल्याचे समजते.

बैलाच्या शक्तीपुढे वंदे भारतची पॉवर ढुस्स, बैलाच्या प्रचंड धडकेने ट्रेनचा पुढला भागच झाला डॅमेज
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीहून अजमेरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) दौसा येथे अपघात झाला. ट्रेनच्या समोर एक बैल (collided with bull) आल्याने धडक झाली, त्यामुळे ट्रेनचा पुढचा भाग खराब (front part of train damaged) झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोलवा आणि अरनिया रेल्वे स्थानकांदरम्यान गादरवारा ब्राह्मणन गावाजवळ या ट्रेनला अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा अपघाताची शिकार झाली आहे. दौसा येथे वंदे भारत गाडीसमोर बैल आल्याने गाडीच्या पुढील बोनेटचे नुकसान झाले आहे. वंदे भारत ट्रेनला असा अपघात होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यावेळी चालकाने आपत्कालीन ब्रेकही लावले. सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

या घटनेनंतर ट्रेन सुमारे 15 मिनिटे घटनास्थळी उभी होती. यानंतर अजमेरच्या दिशेने या गाडीचे प्रयाण झाले. दौसामधील कोलवा आणि अर्निया रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाला.

यापूर्वीही झाला होता ट्रेनचा अपघात

यापूर्वी दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या रेल्वेला ग्वाल्हेरमध्ये अपघात झाला होता. तेथे एक गाय ट्रेनसमोर आल्याने हा अपघात झाला. गायीच्या धडकेने ट्रेनचे बोनेट उघडले आणि समोरच्या भागाचे नुकसान झाले. अपघातानंतर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ग्वाल्हेरच्या डबरा स्टेशनवर काही काळ उभी होती. यादरम्यान ट्रेन पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी स्थानकावरच बोनेट नीट बसवले होते, त्यानंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.

1 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींना दाखवला होता हिरवा झेंडा

दिल्ली ते भोपाळ या मार्गावरील वंदे भारत ट्रेनला 1 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्सप्रेसला भोपाळच्या राणी कमलापती स्थानकापासून नवी दिल्ली स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी 7 तास 50 मिनिटे लागतात.

गुरांच्या धडकेच्या घटनांमुळे रेल्वे चिंतेत

वंदे भारत ट्रेनसमोर आदळण्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रशासन अत्यंत चिंतेत आहे. अशा घटना थांबवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय रेल्वे सध्या आधुनिकतेवर भर देत आहे. रेल्वे स्थानकांची सुधारणा केली जात आहे. नवीन हायस्पीड वाहने लाँच होत आहेत. या मालिकेत सरकारने भविष्यात भारतभर ४०० वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता.