Vande Bharat : वंदे भारतची Political सफर! विकासाचे हे कार्ड गाजणार

| Updated on: Sep 24, 2023 | 11:03 AM

Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुन्हा 9 वंदे भारत ट्रेनची भेट देत आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. जग बुलेट ट्रेनमधून धावत असताना भारताने पण हा सूसाट वेग पकडला आहे. पण वंदे भारतची ही Political सफर कोणाला फायदेशीर ठरेल, हे तर जाणून घ्या..

Vande Bharat : वंदे भारतची Political सफर! विकासाचे हे कार्ड गाजणार
Follow us on

नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाला पुन्हा 9 वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट देत आहेत. थोड्याच वेळात 24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता हा कार्यक्रम होईल. व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे या नवीन 9 वंदे भारत ट्रेनला (Vande Bharat Train) मोदी हिरवा झेंडा दाखवतील. यंदा वंदे भारतच्या माध्यमातून देशातील अनेक ठिकाणं जवळ आली आहेत. तीन ते चार तासांनी प्रवासाचा वेळ आणि पैशांची बचत झाली आहे. लोकप्रियतेमुळे अनेक राज्यांनी वंदे भारतची मागणी केलेली आहे. आता मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये विधानसभेसाठी लढत होईल. तर लोकसभा निवडणूक 2024 हातघाईवर आली आहे. त्यामुळे वंदे भारतची ही पॉलिटिकल सफर कोणाच्या पथ्यावर पडेल, हे नव्याने सांगण्याची गरज आहे का?

रेल्वेने फेटाळले आरोप

तर देशात पॉलिटिकल गेनिंगचा विषय सुरु आहे. वंदे भारत पण त्यातच अंतर्भूत आहे. वंदे भारतच्या रुपाने विकासाचे मॉडेल समोर येत आहे. त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना मिळणार हे उघड आहे. विरोधी राज्यात केंद्राच्या योजनांची विशेष चर्चा सुरु आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारतच्या राजकीय लिंक असल्याचा आरोप फेटाळला आहे.

हे सुद्धा वाचा

सुखर होईल राजकीय प्रवास

  1. देशात 1 एप्रिलपासून आतापर्यत 15 नवीन वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा 9 वंदे भारत ट्रेन धावणार आहे. तर या 15 वंदे भारत ट्रेनपैकी 3 भाजप शासित मध्य प्रदेशात आहेत. तर दोन वंदे भारत दोन राज्यात धावतात. एप्रिल महिन्यात एक तर जून महिन्यात दोन वंदे भारत भोपाळवरुन सुरु झाल्या. भोपााळ दिल्लीसह जबलपूर आणि इंदुरसोबत जोडल्या गेले आहे.
  2. काँग्रेस शासित राजस्थानमध्ये आंतरराज्यीय वंदे भारत सुरु करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात पहिली वंदे भारत दिल्ली-अजमेर धावली. तर जुलै महिन्यात जोधपूर ते साबरमती अशी धावते. जयपूर आणि उदयपूर या शहरांना पण ही सुफरफास्ट रेल्वे जोडते.
  3. उर्वरीत सात वंदे भारत या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आल्याचा राजकीय विश्लेषकांचा व्होरा आहे. ओडिशामध्ये विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यात होतील. या राज्यात मे महिन्यात पुरी ते हावडा अशी वंदे भारत सुरु करण्यात आली. आता पुरी आणि रुरकेला वंदे भारत सुरु होईल.
  4. भाजपने पश्चिम बंगाल, केरळा आणि तामिळनाडूवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. केरळमध्ये एप्रिल महिन्यात पहिली वंदे भारत सुरु झाली. केरळमध्ये सध्या दोन वंदे भारत धावत आहेत. पश्चिम बंगाल राज्याला डिसेंबर 2022 मध्ये पहिली वंदे भारत मिळाली. या वर्षी मे महिन्यात दोन तर आज आणखी दोन वंदे भारत मिळणार आहेत.

  • तामिळनाडू राज्याला गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पहिली तर यावर्षी एप्रिल महिन्यात दुसरी वंदे भारत ट्रेन मिळाली. आज या राज्याला दोन वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट मिळेल. यातील दोन आंतरारज्यीय आहेत. या सूसाट वेगाचा देशाच्या राजकीय नकाशावर सत्ताधाऱ्यांना मोठा फायदा होईल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. आगामी निवडणुकीत विकासाचे हे कार्ड नक्कीच वापरले जाईल, असा अंदाज आहे.