मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालेल्या मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेसला आज अपघात झाला. गायी-म्हशींच्या ताफ्यानं इंजिनाला धडक दिल्याने इंजिनचा मोठा भाग फुटला. सकाळी 11.18 वाजेच्या सुमारासची ही घटना आहे.आज गुरुवारी मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ही ट्रेन वटवा आणि मणिनगर या स्टेशनदरम्यान असताना हा अपघात झाला. सव्वा अकरा वाजेच्या सुमारास गायी-म्हशींचा ताफा धावत्या ट्रेनवर धडकला.
Within 1 week of launch… Ahmedabad Mumbai vande Bharat express met with an accident
Animals came on track@RailMinIndia @AshwiniVaishnaw @IndianRailMedia @RailwaySeva @WesternRly pic.twitter.com/1Gg7ybRrvc— Chetna Raja (@ChetnaRaja) October 6, 2022
सेमी हायस्पीड ट्रेन असल्याने रेल्वेचा वेग जास्त होता. ट्रेन ताशी 100 किमी वेगात होती. मात्र अचानक गायी-म्हशींची झुंड आल्याने ट्रेन थांबवावी लागली.
इंजिनचा समोरील भागाची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली. मात्र या घटनेत जवळपास 20 मिनिटं ट्रेन थांबवून ठेवावी लागली.
या अपघातामुळे ट्रेनच्या इंजिनमध्ये काहीही बिघाड झाला नाही, फक्त समोरील भागाला दुरुस्ती करावी लागली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना विनंती केली आहे. यापुढे अशा प्रकारे जनावरे रेल्वे ट्रॅकवर सोडू नये, असे सांगण्यात आले आहे.
30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई- अहमदाबाद या रेल्वेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं.
देशातील ही तिसरी वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन आहे. अत्यंत सोयीसुविधायुक्त अशी ही ट्रेन आहे. हायटेक सुविधांमुळे ती चर्चेत आहे.
सध्या नवी दिल्ली ते वाराणसी तसेच नवी दिल्ली ते माता वैष्णो देवी कटरा या दरम्यान या दोहोंसह गांधीनगर-मुंबई अशी तिसरी वंदे भारत ट्रेन कार्यान्वित करण्यात आली आहे.