नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातील मोदींचं संसदीय कार्यालय विक्रीला काढण्यात आलं आहे! हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण OLX वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदीय कार्यालय विकण्याची एक जाहिरात देण्यात आली आले. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. (PM Narendra Modi’s office for sale on OLX, 4 arrested)
पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसीतील कार्यालयाच्या फोटो OLX वर टाकत त्याची विक्री किंमत 7.5 कोटी रुपये सांगण्यात आली आहे. यामध्ये कार्यालयाच्या आतील माहिती, खोल्या आणि पार्किंगच्या सुविधेबाबतही सांगण्यात आलं आहे. हे प्रकरण पोलिसांकडे आल्यानंतर OLX वरील मोदींच्या कार्यालय विक्रीची जाहिरात हटवण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन 4 लोकांना ताब्यात घेतलं आहे. ज्या व्यक्तीनं मोदींच्या कार्यालयाचा फोटो OLX वर टाकला त्यालाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वाराणसी पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर करुन या प्रकरणात कारवाई केल्याची माहिती दिली आहे. 4 लोकांना ताब्यात घेतलं असून, एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वाराणसीतील भेलूपूर पोलीस ठाणे हद्दीतील जवाहर नगर परिसरात आहे.
OLX पर शरारती तत्वों द्वारा पीएम के संसदीय कार्यालय को बेचने हेतु दिये गये विज्ञापन के सम्बन्ध में #SSP_VNS @amitpathak09 की बाईट @Uppolice @dgpup @adgzonevaranasi @IgRangeVaranasi @AmarUjalaNews @Live_Hindustan @TOIIndiaNews @htTweets pic.twitter.com/oXLwh34oyM
— Varanasi Police (@varanasipolice) December 18, 2020
पंतप्रधान मोदींच्या या कार्यालयात रोज लोकांना राबता असतो. वाराणसी मतदारसंघातील नागरिक आपली समस्या घेऊन या कार्यालयात येत असतात. इतकच नाही तर याच कार्यालयात पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसीच्या नागरिकांशी संवाद साधतात. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीचा दौरा केला होता. तसंच अनेक कार्यक्रमांना त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती.
संबंधित बातम्या:
पंतप्रधान मोदींचा मास्क घालण्यास नकार; ‘त्या’ व्हिडीओवरुन सोशल मीडियावर ट्रोल
लाल बहादूर शास्त्रींनंतर थेट मोदीच ! 22 डिसेंबर ऐतिहासिक ठरणार !
PM Narendra Modi’s office for sale on OLX, 4 arrested