नवी दिल्ली : देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. अशावेळी विविध राज्यांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिनजचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. अवघे काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा रुग्णालयांमध्ये शिल्लक आहे. अशावेळी रुग्णालय प्रशासन हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीतील शांती मुकुंद रुग्णालयाचे सीईओ सुनील सग्गर यांना रुग्णालयातील परिस्थिती सांगताना अक्षरश: रडू कोसळलं. (Oxygen shortages in Delhi hospitals, CEO of Shanti Mukund Hospital sheds tears)
रुग्णालयातील ऑक्सिजन संकट अधिक गहिरं होत चाललं आहे. अशावेळी सुनील सग्गर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितलं की, ज्या रुग्णांना डिस्चार्ज देणं शक्य आहे त्यांना द्या. रुग्णालयात आता फक्त काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनची स्थिती सांगताना सग्गर यांनी रडू कोसळलं. रुग्णालयात 100 पेक्षा अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 12 जण व्हेंटिलेटरवर आहेत. अशावेळी ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर रुग्ण मरतील. रुग्णालयातील ही परिस्थिती सांगताना सग्गर यांच्या गळा दाटून आला.
#WATCH | Sunil Saggar, CEO, Shanti Mukand Hospital, Delhi breaks down as he speaks about Oxygen crisis at hospital. Says “…We’re hardly left with any oxygen. We’ve requested doctors to discharge patients, whoever can be discharged…It (Oxygen) may last for 2 hrs or something.” pic.twitter.com/U7IDvW4tMG
— ANI (@ANI) April 22, 2021
दुसरीकडे आकाश हेल्थकेअरमध्येही अवघे काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. आकाश हेल्थकेअरचे सीईओ कौशर शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात 200 रुग्ण आहेत आणि ऑक्सिजन फक्त दीड तास पुरेल एवढाच शिल्लक आहे. दिल्लीमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये हीच स्थिती आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारशी संवाद साधला आहे. या कठीण प्रसंगी आपल्याला एकत्र येत भारतीय म्हणून लढावं लागेल, असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय.
दिल्ली में ऑक्सीजन की कमी ना हो, इसके लिए हम पूरी मेहनत कर रहे हैं। मुझे यक़ीन है कि अगर हम सब एक साथ ‘भारतीय’ बनकर लड़ेंगे, तो हम कोरोना को हरा देंगे | Press Conference LIVE https://t.co/v1pizxm3ZD
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 22, 2021
संबंधित बातम्या :
‘अदर पुनावाला ‘डाकू’, सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या’, भाजप आमदाराने तारे तोडले
Oxygen shortages in Delhi hospitals, CEO of Shanti Mukund Hospital sheds tears