नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. केरळमध्ये एका रिक्षात प्रवास करतानाचे राहुल गांधींचे फोटो नुकतेच व्हायरल झाले. तसंच एका लहान मुलाला शूज पाठवून राहुल गांधींनी शब्द पाळल्याच्या बातम्याही आपण वाचल्या किंवा पाहिल्या. आता पुन्हा एकदा एका चिमुकल्याचं पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं राहुल गांधी यांनी एक पाऊल टाकलं आहे. राहुल यांनी त्या चिमुकल्याला विमानाच्या कॉकपिटची सैर करवून आणली! (Rahul Gandhi took a small child on a cockpit tour of the plane)
राहुल गांधी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात राहुल गांधी एका चिमुकल्याशी त्याचे स्वप्न आणि धेय्याबद्दल गप्पा मारताना पाहायला मिळतात. या व्हिडीओत राहुल यांनी त्या मुलाला एअरक्राफ्टची सैर घडवून आणल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडीओ पोस्ट करताना राहुल यांनी लिहिलं आहे की, “कोणतंही स्वप्न खूप मोठं असत नाही. आम्ही आद्वैतचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकलं आहे. आता आपलं कर्तव्य आहे की आपण एक समाज आणि एक असा पाया तयार करु जो त्याला उड्डाण करण्याची संधी देईल”.
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सुरुवात राहुल गांधी एका छोट्या मुलाशी चर्चा करताना होते. राहुल अद्वैतला विचारतात की तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? त्यावर तो चिमुकला मला पायलट बनायचं असल्याचं सांगतो. मी पायलट यासाठी बनणार आहे कारण मला उडायचं आहे, असंही अद्वैत म्हणतो. दुसऱ्या दिवशी राहुल गांधी अद्वैतला एका विमानाच्या कॉकपिटची सैर करण्याची व्यवस्था करतात. राहुल गांधी आणि विमानाचे पायलट या चिमुकल्याला विमान उडवण्याचं तंत्रज्ञान शिकवतानाही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी कन्नूरच्या इर्वती इथं अद्वैत आणि त्याच्या आई-वडिलांशी राहुल यांची भेट झाली. राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नागरिकांकडून तो खूप पंसत केला जात आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 1.6 लाख वेळा पाहिला गेलाय. लोकांनी राहुल गांधी यांच्यावरही कौतुकाचा वर्षावर केला आहे.
संबंधित बातम्या :
Rahul Gandhi took a small child on a cockpit tour of the plane