नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारावरुन भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराने देशाचं विभाजन आणि Direct Action Day ची आठवण करुन दिली. ममता बॅनर्जी यांना जनादेश मिळाला असला तरी ममता बॅनर्जी आपल्या तिसऱ्या टर्मची सुरुवात रक्ताने माखलेल्या हातांनी करत आहेत, अशा शब्दात नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवलाय. (BJP president J. P. Nadda criticizes West Bengal CM Mamata Banerjee)
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा बंगालच्या दौऱ्यावर आहेत. हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर नड्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या ममता बॅनर्जी हिंसाचाराच्या घटनांबाबत ज्या प्रकारे मौन बाळगलं आहे, त्यावरुन या सर्व प्रकाराला त्यांची सहमती असल्याचं स्पष्ट होतं. ममता बॅनर्जी खेला होबे म्हणत होत्या पण त्या असा खेला करतील असं वाटलं नव्हतं. हिंसाचारामुळे जवळपास 80 हजार ते 1 लाख लोक बेघर झाले आहेत. ममता बॅनर्जी म्हणतात त्यांच्या विधानसभा मतदारसंघात हिंसाचार झाला नाही. ही काय मजा आहे काय? असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी नसल्याचं सांगतानाच हिंसाचाराचा विरोध आम्ही लोकशाही पद्धतीने करु, असं नड्डा म्हणाले.
‘भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या परिवारावर हल्ले करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे महिलांवरही हल्ला करण्यात आला. महिलांसोबत दुष्कर्म केलं. महिला सर्वाधिक असुरक्षित आहेत. आम्ही जनादेशाचा आदर करतो, मात्र जनादेशामुळे सत्य लपून राहत नाही. लूटमार सुरु आहे. जेव्हा मी 1946 ची गोष्ट करतो, तेव्हाही रक्ताचे पाट वाहिले होते. आजही 2 मे नंतर पश्चिम बंगालमध्ये रक्त पाहायला मिळत आहे. मी हिंसाचाराचा निषेध करतो. आम्ही असहिष्णुतेचे विचार नष्ट करु’, असा विश्वासही नड्डा यांनी यावेळी व्यक्त केलाय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्यांची हत्या, त्यांची घरं लुटणं, घरांना आग लावणं, भाजप महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केलाय. त्यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आहेत.
हिंसाचाराचे जुने व्हिडीओ पसरवण्याचं काम भाजपकडून सुरु असल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. ‘अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. जिथे भाजपचे उमेदवार जिंकले, तिथे अधिक गोंधल माजला आहे. भाजप आता जुने व्हिडीओ दाखवून हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करत आहे. सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, असे प्रकार थांबवा. निवडणूक काळात तुम्ही सर्वांनी बरंच काही केलंय. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे’, असं ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केलंय.
No such incident can be tolerated. There is more disturbance in places where BJP has won. BJP is circulating about fake incidents through old videos. My appeal to all political parties is to stop this. You all have done a lot during elections. Bengal is a place of unity: WB CM pic.twitter.com/PYyii2xtJl
— ANI (@ANI) May 5, 2021
संबंधित बातम्या :
West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शुन्यावर!
BJP president J. P. Nadda criticizes West Bengal CM Mamata Banerjee