नवी दिल्लीः गुन्हेगारी जगतात गुन्हा करण्यासाठी गुन्हेगारांच्या कल्पनेला मर्यादा नसते, तस्करी करणारे तर लाखो कल्पना शोधून काढतत. विदेशातून देशात होणारी तस्करीचे प्रकार बघून तर केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा धक्का बसला आहे. सीमाशुल्क (custom duty) चुकवण्यासाठी तस्करी करणारे अनेक जण नवनवे फंडे शोधून काढतात. नुकताच कस्टम विभागाने कारवाई केलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एकाने लाखो रुपयांचे विदेशी चलन (foreign currency) मिठाईच्या बॉक्समधून (Box of sweets) लपवून आणल होते. मात्र केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या संशयिताला बरोबर पकडले, आणि त्याच्यावर कारवाई केली गेली आहे.
Always alert & vigil to Protect & Secure !#CISF nabbed a passenger carrying foreign currency worth approx INR 54 lakh concealed ingeniously inside ‘False layer of Bag & Sweet Box’ at IGI Airport, Delhi. The passenger was handed over to Customs.@HMOIndia@MoCA_GoI@JM_Scindia pic.twitter.com/7vQSHBvV1x
— CISF (@CISFHQrs) September 7, 2022
आयजीआय इंटरनॅशनल एअरपोर्टवर विदेशी चलनाची तस्करी करताना एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, त्याने बॅग आणि मिठाईच्या बॉक्समधून 2.5 लाख सौदी रियाल लपवून आणले होते.
भारतीय चलनानुसार अंदाजे त्याची किंमत 54 लाख रुपये आहे. त्यामुळे एवढे लाखो रुपये लपवून आणलेल्या या व्यक्तीच्या तपासाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
विमानतळावर ही कारवाई करण्यात आल्यानंतर सीआयएसएफच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यामध्ये सीआयएसएफकडून दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलेल्या व्यक्तीच्या बॅगमधील आणि मिठाईच्या बॉक्समधील 54 लाखाचे लपवलेले विदेशी चलन दाखवण्यात आले आहे. त्यानंतर तात्काळ त्या व्यक्तीला सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करण्यात आलेल्या त्या व्यक्तीचे नाव जसविंदर सिंग असे असून त्याने 7 सप्टेंबरला सकाळी 6.45 वाजता आला होता.
त्यानंतर विमानतळावर त्याची चौकशी आणि तपासणी करताना हा त्याच्या बॅगमध्ये आणि मिठाईच्या बॉक्समध्ये लपवलेले विदेशी चलन कंप्युटर्सच्या साहाय्याने उघड झाले. त्यानंतर त्याच्याकडील सर्व साहित्याची तपासणी करुन झाल्यानंतर सीमाशुल्क खात्याने त्याला ताब्यात घेतले आहे.