Viral Video : लग्न समारंभात तंदुर बनवणाऱ्यानं असं काही केलं की तुम्ही शिव्या घालाल!

| Updated on: Feb 19, 2021 | 9:48 PM

काही व्हिडीओ पाहून तुम्हाला राग आल्याशिवाय राहत नाही. सध्या तंदूर बनवणाऱ्या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला शिव्या घालण्याचीच इच्छा होईल.

Viral Video : लग्न समारंभात तंदुर बनवणाऱ्यानं असं काही केलं की तुम्ही शिव्या घालाल!
Follow us on

मुंबई : तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचे शौकिन असाल तर तुम्ही तंदुर रोटी किंवा नान मागवता. अनेक लग्न समारंभातही खाण्याच्या पदार्थात तंदूर असतो. तंदुर बनवणाऱ्या मुलाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणारे काही व्हिडीओ खूप एंटरटेनिंग असतात तर काही खूप इमोशनल. तर काही व्हिडीओ पाहून तुम्हाला राग आल्याशिवाय राहत नाही. सध्या तंदूर बनवणाऱ्या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला शिव्या घालण्याचीच इच्छा होईल. (People are angry over a video of a tandoor maker going viral on social media)

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तंदुर बनवणारा मुलगा एका लग्नात तंदुर बनवताना पाहायवला मिळतोय. चिड येणारी बाब म्हणजे हा मुलगा तंदूर बनवताना त्यावर थुंकताना दिसतोय. ज्याने कुणी हा व्हिडीओ पाहिला आहे त्याने या मुलाला शिव्या घातल्या आहेत. तसंच हा व्यक्ती असं का करतो आहे? असा प्रश्न त्यांना पडलाय. अशाप्रकारे तंदुरवर थुंकण्याची गरजच काय? असा प्रश्नही विचारला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा या व्हिडीओची पुष्टी अद्याप झालेली नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. लोक हा व्हिडीओ पाहून राग व्यक्त करत आहेत. तंदुर बनवताना थुंकणारा हा व्यक्ती कोण आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न अनेल लोक करत आहेत. तसंच हा व्हिडीओ नेमका कुठल आहे? असा प्रश्नही लोकांना पडलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओबाबत लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

इतर बातम्या :

Jhund movie : प्रतीक्षा संपली, नागराजच्या ‘झुंड’च्या प्रदर्शनाची तारीख बिग बींकडून जाहीर

Gold-Silver Price today : स्वस्त झालं सोनं, चांदीही घसरली; वाचा आजचे ताजे भाव

People are angry over a video of a tandoor maker going viral on social media