मुंबई | 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणकांचा तारखा जाहीर झाल्या आहेत. 19 एप्रिल ते 1 जून 2024 दरम्यान देशभरात निवडणूका होणार आहेत. तर 4 जून रोजी निकाल येणार आहेत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव शिस्तबद्ध आणि निष्पक्ष पद्धतीने साजरा होण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. विविध राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कॅंपेन सुरु केले आहे. अनेकदा मतदानावेळी आपले नावच मतदार यादी नसल्याचे उघड झाल्याने अनेकांचा हिरमोड होतो. त्यामुळे आताच आपण आपले नाव मतदार यादीत आहे का ? हे घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासून पाहूयात.
व्होटर लिस्टमध्ये आपले नाव तपासून पाहण्यासाठी आपल्याकडे काही आवश्यक माहीती हवी. आपल्या व्होटर आयडीवर EPIC Number ( Electors Photo Identification Card ) असायला हवे. त्याशिवाय मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी तुम्हाला नाव, वय, जन्म तारीख, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघाची माहीत असायला हवी.
सर्वात आधी आपल्याला गुगल वर Voters service Portal लिहून सर्च करावे लागणार आहे. किंवा तुम्ही थेट electoralsearch.eci.gov.in वर देखील जाऊ शकता. या सरकारी वेबसाईटवर तुम्हाला व्होटल लिस्टमध्ये नाव तपासण्यासाठी तीन पर्याय मिळतील.
पहिल्या ऑप्शन हा आहे की आपण आपले डिटेल्स टाकून व्होटर लिस्टमध्ये नाव चेक करु शकता. दुसरी पद्धत search by EPIC आणि तिसरी पद्धत Search by Mobile. तुम्ही कोणत्या एका पर्यायाचा वापर करून आपले नाव तपासू शकता. सर्व डिटेल्स माहीती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे कळू शकते.
सर्च बाय डिटेल्सद्वारे जर तुम्ही तुमचे नाव चेक करीत असाल तर या पर्यायात आपल्याकडून काही माहीती मागितली जाईल. सर्वात आधी तुम्हाला राज्य आणि भाषा निवडावी लागेल. त्यानंतर पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, वय, जेंडर, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ याची माहीती भरावी लागेल. डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोडद्वारे सर्च करावे लागेल.
येथे पाहा पहिला पर्याय – ( फोटो क्रेडीट- electoralsearch.eci.gov.in )
जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला तर तुम्हाला आधी भाषा निवडावी लागेल. त्यानंतर EPIC क्रमांक, राज्य आणि कॅप्चा कोड टाकून सर्च करावे लागेल.
येथे पाहा दुसरा पर्याय – ( फोटो क्रेडीट- electoralsearch.eci.gov.in )
या पर्यायाची निवड केल्यास तुम्हाला राज्य आणि भाषाची निवड करावी लागेल, नंतर आपला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपी नावाचा ऑप्शन क्लिक करावा लागेल. आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या सर्च ऑप्शनला क्लिक करावे लागेल. सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही.
येथे पाहा तिसरा पर्याय – ( फोटो क्रेडीट- electoralsearch.eci.gov.in )