कर्नाटक : 1 मिनिट 40सेकंदाचा कर्नाटकातील व्हिडीओ मंगळवारी (8 फेब्रुवारी, 2022) समोर आला आहे. एक मुलगी आपली दुचाकी कॉलेजच्या आवारात पार्क करते. यानंतर ही विद्यार्थीनी कॉलेजमध्ये प्रवेश करण्यासाठी इमारतीच्या दिशेनं चालू लागते. दरम्यान, या विद्यार्थीनीला घेराव घालण्याचा प्रयत्न होतो. भगवे शेले (saffron scarves) घेऊन असलेले काही विद्यार्थी या बुरखा (hijab) घातलेल्या विद्यार्थीनीसमोर जोरदार घोषणाबाजी करतात. जय श्री रामची नारे लगावले जातात. कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा (Karnataka Collage Students) आवेश प्रचंड असतो. विद्यार्थीही आपल्या भाषेत या विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीला उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसते. अल्ला हू अकबर असं म्हणत ही विद्यार्थीनीही तिला छेडणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसते. एकटी विद्यार्थींनी बुरखा घालून या आक्रमक झालेल्या मुलांच्या विरोधाला न जुमानता कॉलेजच्या दिशेने जाते. कॉलेजमधीलच काही जणही या विद्यार्थीनीली सुरक्षित आत घेऊन जाण्यासाठी तिच्या आजूबाजूला दिसून आले आहे. मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांच्या जय श्री रामच्या घोषणा कुठेही थांबलेल्या नाहीत.
Video | जय श्री रामला विद्यार्थीनीचं अल्ला हू अकबरनं प्रत्युत्तर | Hijab Controversy | #Karnataka #Hijab #Student #Muslim #Hindu
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRyeJh9 pic.twitter.com/Wl6VF6ABZP— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2022
हिजाब बंदीविरोधात कर्नाटकात सुनावणी सुरु आहेत. या सुनावणी दरम्यान आता कोर्टानं उच्च कुरणच्या प्रतीदेखील मागवल्या आहेत. दरम्यान, वाद सुरु झाला जानेवारी महिन्यामधेच! जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असं सांगितलं गेलं. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळालं आणि वादाला सुरुवात झाली.
कर्नाटकात शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा असा वाद निर्माण झाला आहे. शाळांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. काही ठिकाणी तर बजरंग दलाने विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालण्याची सक्ती केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जय श्रीरामचे नारेही दिले जात आहेत. कुंदापुरातील शाळा-महाविद्यालयात जय श्रीरामचे नारे दिल्याने वातावरण तंग झालं आहे. उडुपी जिल्ह्याीतल बिंदूर गावातील गव्हर्नमेंट प्री-विद्यापीठ कॉलेजात ही घटना घडली. या घटनेमुळे शाळा आणि महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. प्राचार्यांनी हिंदू संघटनांना भगवा स्कार्फ परिधान करण्याची मोहीम मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, हिंदू संघटना अधिकच आक्रमक झाल्याने शाळेतील वातावरण अधिकच तंग झालं आहे.
आम्ही पूर्वी हिजाब घालूनच शाळा-महाविद्यालयात यायचो. त्यावर पूर्वी कधी वाद झाला नाही. कुणी आक्षेप घेतला नाही. आमच्या घरातील मुलींनीही अशाच प्रकारे शिक्षण घेतलं आहे. मात्र आता हिजाबवर वाद केला जात आहे, असं मुस्लिम विद्यार्थींनींनी म्हटलं आहे. दुसरीकडे एका वर्गाला ड्रेसचा आणि शिक्षणाचं काही घेणं देणं नसल्याचं वाटतं. मात्र, सर्व शाळेत एक समान नियम असावेत असं या वर्गाचं म्हणणं आहे.
‘नमस्ते ट्रम्प’मुळेच कोरोना पसरला, मोदी हेच त्याला जबाबदार; नवाब मलिकांचा हल्लाबोल