लोकसभा निवडणूकांचा सहावा टप्पा शनिवारी पार पडला. बिहारच्या पाटणाच्या दनियावा लोकसभा मतदार संघात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रचारसभा सुरु होती. यावेळी भाषणात नितीश कुमार यांची जिभ घसरली. आम्ही बिहारात सर्व 40 जागांवर आणि देशभरात 400 जागा जिंकणार आहोत. नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री बनणार. म्हणजे देशाचा विकास होईल आणि बिहारचा विकास होईल. नंतर भानावर येत त्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेतच आणि पुन्हा राहतील असे चुक दुरुस्त करीत सांगितले.
या प्रचारसभेत नितीश कुमार यांनी आरजेडीवर जोरदार टीका केली, त्या लोकांनी काही काम केले नाही. साल 2005 आधी संध्याकाळचे लोकं घाबरुन घराबाहेर पडायचे नाहीत. खूप भांडणे व्हायचीत. आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था बकाल होती. रस्त्यांची दुर्दशा झाली होती. जेव्हा मी खासदार होतो तेव्हा काही जागांवर रस्ते होते. इतर ठिकाणी पाऊलवाटा होत्या. त्यांना ( आरजेडी ) संधी मिळाली परंतू त्यांनी काही काम केले नसल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.
आरजेडीवर टीका करताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ‘आज ते आमच्याविरोधात टिका करतात की आम्ही काही काम नाही केले. परंतू हे संपूर्णपणे खोटं आहे.’ आपले एकेकाळचे सहकारी लालू यांचे नाव न घेता त्यांनी नितीश कुमार यांनी जोरदार टीका केली की एका माणसाने 9 मुला- मुलींना जन्म घातला आणि आता देखील मुलगा-मुलगी करीत आहे. आम्ही त्यांच्या सोबत सरकार स्थापन केले, परंतू पाहीले की ते गडबड करीत आहेत असेही त्यांनी सांगितले.