दिल्लीनंतर या राज्यांतून आता बरसणार; चक्रीवादळाचाही बसणार फटका…

| Updated on: May 30, 2023 | 1:19 AM

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महाकालमध्ये सप्तऋषींच्या मूर्तींचीही मोडतोड झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दिल्लीनंतर या राज्यांतून आता बरसणार; चक्रीवादळाचाही बसणार फटका...
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक भागात प्रचंड उन्हाचे चटके बसू लागले होते, मात्र आता देशातील अनेक राज्यांमध्ये कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पावसाने आता हळूहळू सक्रिय होत अनेक राज्यातील तापमानात पावसामुळे घट होऊ लागल्याची नोंद केली जाऊ लागली आहे. याच भागात हवामान खात्याने आता उत्तर-पश्चिमेबाबतही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आणखी काही राज्यांमध्ये आता पावसाची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, 31 मेपर्यंत वायव्य राज्यांमध्ये अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

YouTube video player

सध्या दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि पाकिस्तानवर चक्रीवादळाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

त्याचप्रमाणे पुढील काही तासामध्ये राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि अंदमान निकोबार बेटांवरही जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड या डोंगराळ राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच यावेळी मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महाकालमध्ये सप्तऋषींच्या मूर्तींचीही मोडतोड झाल्याचे सांगण्यात आले आहे.

आता भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर येणारे दोन-तीन दिवस अधिक आनंददायी असणार आहेत. जूनच्या पहिल्या काही दिवसात ढगाळ वातावरण असणार असून.

त्यानंतर आता पुन्हा तापमानात वाढ होऊन नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमधील लोकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळत आहे. तर पावसामुळे उष्णता थोडी कमी झाली आहे.