नवी दिल्लीः देशाच्या राजधानीत दिल्लीत (Delhi Rain) पुढील काही दिवस पाऊस होणार नसला तरी भारतातील अनेक जिल्ह्यांमधून पुढील 4 दिवस पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्राला मात्र यलो अलर्ट (Maharashtra Yellow Alert ) दिला असून काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमधून मुसळधार पाऊस होत आहे. कर्नाटकातील बेंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) बेंगळुरू शहरभर पाणी साचले होते. त्यामुळे शहरातून बोटीने जाण्याचा प्रसंग कर्नाटकातील नागरिकांवर आला होता. तर महाराष्ट्रातही गेल्या काही तासांपासून विविध भागात पाऊस सुरु असून पुढील 4 दिवस मात्र जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
देशातील अनेक राज्यांमधून पाऊस होत असला तरी दिल्लीत मात्र तापमान वाढले असून दिल्लीकर पुन्हा एकदा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या दिल्लीत 27 डिग्रीपासून ते अगदी 37 डिग्रीपर्यंत तापमान राहिले आहे, त्यामुळे दिल्लीत उष्णता वाढली असून दिल्लीकर पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्येही उष्णता वाढली असून पुढील दोन तीन दिवसात काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यांतून पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागात पुन्हा पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार असल्याने पुन्हा पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुरामुळे राज्यातील विविध भागाती नगारिकांचे जीवन विस्कळीत होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण छत्तीसगड, तेलंगाना,मध्य महाराष्ट्रात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.तर बिहार, झारखंड, दक्षिण गुजरात आणि लक्षद्वीपमध्येही हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या शक्यता आहे.