कोलकाता: पश्चिम बंगाल आणि आसामचा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्क आणि पोलस्ट्र्रॅट या संस्थेने जाहीर केला आहे. यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 146 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 2016 च्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळवणारा भाजप 122 जागांपर्यंत मुसंडी मारण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीची पिछेहाट होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 23 जागा मिळतील, असा अंदाज आहे. आसाममध्ये भाजप पुन्हा सत्ता मिळवेल असा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. आसाममध्ये 126 जागांपैकी 73 जागा भाजपला मिळतील. तर काँग्रेस आघाडीला 50 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. टीमएसीला 146 जागा, भाजपला 122 जागा, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 23 आणि इतर पक्षांना 3 जागा मिळतील, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.
आसाममध्ये भाजप पुन्हा
आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. भाजपला 73 जागा मिळण्याचा अंदाज असून काँग्रेसला 50 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. आसाममधून 2014 पासून भाजपचं सरकार आहे.
आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता असून तिथे तीन टप्प्यात निडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा
दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा
तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा
चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा
पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा
सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा
सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा
आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा
मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी
आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार?
भाजप : 73
काँग्रेस: 50
इतर: 3
पश्चिम बंगालमध्ये विविध विभागात कोण आघाडीवर?
विभाग / पार्टी | टीएमसी | बीजेपी | काँग्रेस +डावे | इतर |
---|---|---|---|---|
सेंट्रल बंगाल | 39.3 | 37.3 | 17.5 | 6 |
ग्रेटर कोलकाता | 40.1 | 37.4 | 16.7 | 5.8 |
नॉर्थ बंगाल | 39.8 | 37.8 | 16.5 | 5.9 |
साऊथ बंगाल | 38.6 | 36.2 | 19.5 | 5.7 |
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी लढत
पश्चिम बंगालच्या 294 जागांपैकी 146 जागांवर टीमसी विजयी होण्याचा अंदाज आहे. तर भाजप 122 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीएमसी आणि भाजपमध्ये जोरदार लढत होत असल्याचं दिसत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस बहुमताच्याजवळ राहील, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. भाजप जोरदार मुसंडी मारणार असल्याचं दिसत असून गेल्यावेळी 3 जागा मिळवणारी भाजप 122 जागा मिळवेल, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसला 146 जागा मिळतील, तर काँग्रेस डाव्या पक्षांच्या आघाडीला 23 जागांवर समाधान मानावं लागेल, असं दिसतं.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कामगिरी कशी आहे? हा प्रश्न विचारला असता मतदारांनी पुढीलप्रमाणं कौल दिला आहे.
चांगली: 57 टक्के
वाईट: 43 टक्के
पश्चिम बंगालमध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार?
तृणमूल काँग्रेस: 39.6टक्के
भाजप : 37.1 टक्के
काँग्रेस आणि डावे पक्ष आघाडी: 17.4 टक्के
सांगू शकत नाही: 5.9 टक्के
नंदीग्राममध्ये कोणत्या पक्षाचा विजय होणार?
तृणमूल काँग्रेस: 46 टक्के
भाजप : 36.1 टक्के
काँग्रेस आणि डावे पक्ष आघाडी: 10 टक्के
सांगू शकत नाही: 7.9 टक्के
तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चांगले वाटतात?
होय: 42.3 टक्के
नाही : 34.3 टक्के
सांगू शकत नाही : 23.4 टक्के
सुवेंदू अधिकारी यांच्या भाजप प्रवेशाचा टीएमसीला फटका?
अधिक फटका: 34.5 टक्के
थोडा फटका: 15.4 टक्के
अजिबात नाही : 39.9 टक्के
उत्तर सांगू शकत नाही: 10.2 टक्के
आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता असून तिथे 126 जागांसाठी तीन टप्प्यात निडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा
दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा
तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा
चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा
पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा
सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा
सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा
आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा
मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी