मुंबई | राज्य सरकारने 6 सप्टेंबर रोजी एकूण 345 आमदारांना निधी वाटप केलं. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांसाठी म्हणजेच आमदारांना प्रत्येकी 70 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. राज्य सरकारडकडून यासाठी तब्बल 241 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य सरकारने मंजूर झालेला निधी जिल्हाधिकाऱ्यांना सोपवला आहे. तसेच आमदारांच्या कामांना मान्यता देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आमदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच मोठी बातमी समोर आली आहे.
निधी मंजूर झाल्याने आमदार आनंदीआनंद आहेत. तर दुसऱ्या बाजूला आमदारांच्या पगारात मोठी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनीच ही घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील आमदारांच्या पगारात तब्बल 40 हजार रुपयांनी घशघशीत वाढ करण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रनंतर पश्चिम बंगालमधील आमदारांनाही गूडन्युज मिळाली आहे.
“पश्चिम बंगाल विधानसभेतील सदस्यांचं वेतन हे इतर राज्यातील आमदारांच्या तुलनेत फार कमी आहे. त्यामुळे आमदारांच्या वेतनात दरमहा 40 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. मात्र ममता बॅनर्जी यांनी या घोषणेसह अन्य भत्त्यांबाबत कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही.
पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विधानसभेत मोठी घोषणा
West Bengal CM Mamata Banerjee in the Assembly today announced a hike of Rs 40,000 per month in salaries of MLAs of the state. pic.twitter.com/QkJKeZ4ZYT
— ANI (@ANI) September 7, 2023
या पगारवाढीच्या घोषणेमुळे आमदारांना आता 10 ऐवजी 40 हजार रुपये दरमहा मिळणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या राज्यमंत्र्यांना 10 हजार 900 रुपयांऐवजी 50 हजार 900 रुपये मिळणार आहेत. तसेच कॅबिनेट मंत्र्यांना 11 हजारऐवजी 51 हजार रुपये वेतन म्हणून देण्यात येणार आहेत.
दरम्यान आमदारांच्या वेतनात झालेल्या या वाढीमुळे एकूण पगाराने 1 लाखाचा टप्पा पार केला आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वेतन आणि अन्य भत्त्यांसह आमदारांना दरमहा मिळणारी एकूण रक्कम ही 81 हजार रुपयांवरुन 1 लाख 21 हजार रुपये इतकी होईल. तर मंत्र्यांना मिळणाऱ्या 1 लाख 10 हजार रुपयांऐवजी आता 1 लाख 50 हजार रुपये दरमहा मिळतील. “