West Bengal Election 2021 : TMC म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’, पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

| Updated on: Mar 18, 2021 | 4:07 PM

पुरुलियामध्ये विकासाच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधतानाचा पश्चिम बंगालमध्ये डबल इंजिनची सरकार बनणार असल्याचा दावा केलाय.

West Bengal Election 2021 : TMC म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन, पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पुरुलियामध्ये विकासाच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधतानाचा पश्चिम बंगालमध्ये डबल इंजिनची सरकार बनणार असल्याचा दावा केलाय. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा खेळ समाप्त झालाय. भाजपचा डीबीटी डायरेक्ट बेनिफट ट्रान्सफर, तर TMC ट्रान्सफर माय कमिशन बनली असल्याचा टोलाही पंतप्रधानांनी लगावला आहे.(PM Narendra Modi criticized the Trinamool Congress and Mamata Banerjee)


“पूर्ण जंगलमहलच्या लोकांना विश्वास देण्यसाठी आलो आहे की, बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तुमच्या प्रश्नांना प्राथमिकता देत ते सोडवले जातील. बंगालमध्ये डबल इंजिनची सरकार बनेल. एक दिल्लीचं इंजिन आणि दुरसं बंगालचं इंजिन, जेव्हा डबल इंजिनची सरकारी बनेल, तर विकासही होईल आणि जीवनही सोपं होईल”, असं दावा पंतप्रधान मोदींनी केलाय. पश्चिम बंगालचा प्रत्येक भाग रेल्वेनं जोडण्याची भाजपची प्राथमिकता आहे. 50 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला परवानगी देण्यात आली आहे. दोन मे नंतर भाजपचं सरकार बनेल, तेव्हा डानकुनीच्या सेक्शनमध्ये काम जोरात होईल. पुरुलियाही या कॉरिडॉरने जोडला जाणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचं मोदी म्हणाले.

बंगालमध्ये बदलाचे वारे- पंतप्रधान

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘मला आनंद होतोय की, 18 मार्चला पश्चिम बंगालमध्ये माझ्या बंधु-भगिनींमध्ये जाण्याची संधी मिळतेय. मी पुरुलियामध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहे. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची इच्छा आहे. भाजपच्या सुशासनाच्या अजेंड्याला लोक पसंत करत आहेत’, असं मोदी म्हणाले होते.

‘मां, माटी और मानुष’वरुन राजनाथ सिंहांचा ममतांना टोला

“ममता यांनी सांगितलं होतं की, ‘मां, माटी और मानुष’! पण आज इथं ना मां सुरक्षित आहे, ना मानुष सुरक्षित आहे, ना पश्चिम बंगालची माती सुरक्षित आहे”, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र डागलं. त्यातबरोबर ममता बॅनर्जी या प्रचारादरम्यान अपघातामुळे जखमी झाल्या. त्यांनी भाजपवर आरोप केला. पण तपासात त्यांच्या सुरक्षेत कसूर झाल्यामुळे त्या जखमी झाल्याचं समोर आलं, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

संबंधित बातम्या : 

West Bengal Election : ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्हे लपवले? उमेदवारी रद्द करा, भाजप आक्रमक

West Bengal Election 2021 : ‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय?’, कोलकात्यात बसून कट रचला जात असल्याचा ममतांचा आरोप!

PM Narendra Modi criticized the Trinamool Congress and Mamata Banerjee