नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये आता निवडणुकीचा रणसंग्राम आता अधिक तापताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी कोलकातामध्ये भव्य रॅली केल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी हिंदू कार्ड बाहेर काढलं आहे. नंदिग्राममधून निवडणुकीची घोषणा केल्यानंतर ममता बॅनर्जी मंगळवारी मतदारसंघात पोहोचल्या. यावेळी त्यांनी हिंदू कार्ड बाहेर काढून सर्वांनाच धक्का दिला. व्यासपीठावरुन त्यांनी भाजपला फक्त हिंदुत्वाचा पाठ समजावून सांगितला नाही तर कालीमातेची भक्त असल्याचं सांगत चंडी पाठही म्हटला.(Mamata Banerjee visited 3 temples in Nandigram, bowed her head at Shamshabad Dargah)
ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर मुस्लिम मतं जास्त असल्यामुळे नंदिग्रामची निवड केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी त्या नंदिग्राममध्ये पोहोचल्या. त्यावेळी ममता मुस्लिमांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण झालं उलटंच! त्यांनी सर्व शक्यतांना फोल ठरवत हिंदू कार्ड बाहेर काढलं.
नंदिग्रामच्या बरतला इथं मतदारांना संबोधित करताना ममता म्हणाल्या की, ‘मी एक हिंदू आहे. जे लोक 70 आणि 30 टक्क्यांचं कार्ड खेळत आहेत, त्यांनी सावध राहावं’. ममता यांनी व्यासपीठावरुन चंडी पाठसह अनेक मंत्रोच्चार केले. बराच वेळ त्या मंत्रोच्चार करत राहिल्या. आपण महाशिवरात्र नंदिग्राममध्ये साजरी करुन मगच जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
बरतलामधील जनसभेला संबोधित केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी 13 किलोमीटर दूर असलेलं हरी मंदिर गाठलं. तिथे त्यांनी पूजाअर्चा केली. त्यानंतर त्यांनी दुर्गा मंदिर आणि काही अंतरावर असलेल्या जगन्नाथ मंदिरात जात दर्शन घेतलं. एकीकडे ममता बॅनर्जी यांच्या भाषणादरम्यान झालेल्या जय श्री रामाच्या घोषणेनंतर त्या भडकल्याचं चित्र संपूर्ण देशानं पाहिलं. तर दुसरीकडे त्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच मंदिरांचं दर्शन घेत भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता भाजप ममतांच्या या हिंदू कार्डला कसं प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळी 3 मंदिरात जात दर्शन घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी संध्याकाळी मुस्लिम मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी शमशाबाद दर्ग्यावर जात त्यांनी चादर चढवली आणि तिथे उपस्थित मुस्लिम बांधवांशी संवादही साधला.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee visits Shamshabad Mazar in Nandigram and offers a chadar there. pic.twitter.com/c1ZSv2vVU0
— ANI (@ANI) March 9, 2021
नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचं अजून एक रुप पाहायला मिळालं. शहरातील एका चहाच्या दुकानावर ममता बॅनर्जी यांनी थेट चहाची किटलीच हातात घेतली आणि सर्वांना चहा वाटला. ममता यांचं हे रुप पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
#WATCH: West Bengal CM Mamata Banerjee serves tea to everyone at a tea stall in Nandigram. The CM herself had tea at the stall. pic.twitter.com/0FwnNgZF44
— ANI (@ANI) March 9, 2021
संबंधित बातम्या :
ममतांच्या जीवावर संसदेत पोहचणारे मिथून चक्रवर्ती भाजपात कसे? काय आहे गुपित?
Mamata Banerjee visited 3 temples in Nandigram, bowed her head at Shamshabad Dargah