नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात हायव्होल्टेज नंदीग्रामच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि नंदीग्रामच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोन करुन मतदानावेळी मोठी गडबड केली जात असल्याचा आरोप केलाय. तसंच याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. (Mamata Banerjee’s phone call to the Governor in Nandigram)
निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. आतापर्यंत 63 तक्रारी दाखल झाल्या आहेत पण एकाही तक्रारीवर कारवाई झालेली नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी नंदीग्राममध्ये समस्या निर्माण करण्याचे निर्देश दिले होते, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. दरम्यान, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामसह 30 जागा भाजप जिंकेल असा दावा केला आहे.
#WATCH: West Bengal CM Mamata Banerjee speaks to Governor Jagdeep Dhankhar over the phone at a polling booth in Nandigram. She says, “…They didn’t allow the local people to cast their vote. From morning I am campaigning…Now I am appealing to you, please see…” pic.twitter.com/mjsNQx38BB
— ANI (@ANI) April 1, 2021
ममता बॅनर्जी जेव्हा बूथवर दाखल झाल्या तेव्हा भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आणि एकमेकांवर आरोप लावले. भाजपचे लोक मतदान केंद्रांवर ताबा मिळवत मतदान प्रक्रिया प्रभावित करत आहेत, असा आरोप तृणमूलकडून करण्यात येतोय. ममता बॅनर्जी नंदीग्रामच्या ब्लॉक टू मधील मुस्लिम बहुल भागाचाही दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय.
West Bengal CM Mamata Banerjee visits a polling booth in Nandigram.
She is contesting against BJP’s Suvendu Adhikari, from the constituency in #WestBengalElections2021 pic.twitter.com/W5IP6bjfyY
— ANI (@ANI) April 1, 2021
तृणमूल काँग्रेसचे पोलिस एजंट शेख सुफियानने आरोप केलाय की बूथवर सेंट्रल फोर्सेसच्या जवानांनी मतदारांना मारहाण केली. त्यांच्या एजेंटला बूथमध्ये प्रवेश करु दिला नाही. महिलांनाही आरोप केलाय की केंद्रीय बलाच्या जवानांनी त्यांना मारहाण केली. दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आपल्याला मतदान करु दिलं जात नसल्याचा आरोप केला आहे.
संबंधित बातम्या :
West Bengal Elections 2021 : शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक, बंगालमध्ये राडेबाजी सुरुच
निवडणुकीत फटका बसेल या भीतीपोटीच मोदी आणि शाहांनी एका रात्रीत ‘तो’ निर्णय फिरवला
Mamata Banerjee’s phone call to the Governor in Nandigram