कोलकाता : नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान जखमी झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. व्हीलचेअरवर बसून त्यांनी आज प्रचार रॅलीत सहभाग घेतला. इतकच नाही तर जखमी वाघिण जास्त घातक असते, अशा शब्दात विरोधी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलं आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप तृणमूळ काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पण हा हल्ला नाही तर अपघात असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. यावेळीच ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे.(Mamata Banerjee’s wheelchair campaign for West Bengal Assembly elections)
जमखी अवस्थेतही ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात उतरल्या आहेत. एका व्हीलचेअरवर बसून त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या ममता जनतेला हात जोडून अभिवादन करत होत्या. पश्चिम बंगालमध्ये 14 मार्च रोजी नंदीग्राम दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त मायो रोड ते हादरा मोड अशी 5 किलोमीटरची रॅली तृणमूल काँग्रेसकडून काढण्यात आली.
तासाभराच्या रोड शोनंतर ममता बॅनर्जी यांनी एका सभेलाही संबोधित केलं. मला निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. आपण व्हीलचेअरवर बसूनच राज्यभर उमेदवारांचा प्रचार करणार आहोत. मी जीवनात अनेक हल्ल्यांच्या सामना केला आहे. मात्र मी कधी कुणासमोर आत्मसमर्पण केलं नाही. मी माझी मान कधीच वाकवणार नाही. एक जखमी वाघिण अधिक घातक असते, अशा शब्दात ममता यांनी जणू डरकाळीच फोडली आहे.
West Bengal CM Mamata Banerjee arrives at Gandhi Murti in Kolkata on a wheelchair. She will hold a roadshow to Hazra shortly. pic.twitter.com/JnAwDSdyVE
— ANI (@ANI) March 14, 2021
ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचे कोणतेही पुरवे नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि अन्य दोन विशेष निवडणूक अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावरुन निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापत ही कुठल्याही हल्ल्यातून झाली नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
अहवालानुसार ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही. त्यांना झालेली दुखापत ही छोट्याशा अपघातामुळे झाल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. स्पेशल ऑब्जर्व्हर अजय नायक यांनी दिलेल्या अहवालानुसार निवडणूक आयोगाने असं म्हटलं आहे. हा अहवाल शनिवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. यापूर्वी देण्यात आलेल्या अहवालावर निवडणूक आयोग असमाधानी होतं. त्या अहवालात ममता बॅनर्जी यांना दुखापत नेकमी कोणत्या कारणामुळे झाली, हेच सांगितलं गेलं नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत एक सविस्तर अहवाल मागवला होता.
#UPDATE | Election Commission removes Vivek Sahay from post of Director, Security & places him under suspension.
“Charges must be framed against him within a week for grossly failing in discharge of his primary duty as Director Security to protect the Z+ protectee,” the EC says
— ANI (@ANI) March 14, 2021
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा होती. पण त्यात कुठेतरी कमतरता निर्माण झाली आणि ते आपल्या कर्तव्यात कमी पडले, असा ठपका ठेवत त्यांच्यावर आठवड्याभरात गुन्हा नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने पूर्व मेदिनीपूरचे डीएम आणि डीईओ विभू पांडेय यांची बदली केली आहे. त्यांना निवडणूक व्यतिरिक्त काम देण्यात आलं आहे. त्यांच्या जागी स्मिता पांडेय यांच्याकडे डीएम पदाचा कारभार देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मेदिनीपूरचे एसपी प्रवीण प्रकाश यांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत अधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडली आहे.
संबंधित बातम्या :
Mamata banerjee Injured : ममता बॅनर्जींचे सुरक्षा संचालक निलंबित, जिल्हाधिकारी आणि एसपींवरही कारवाई
दिदीची विचारपुस करण्यासाठी भाजप नेते हॉस्पिटलमध्ये, तर TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार, वाचा सविस्तर
Mamata Banerjee’s wheelchair campaign for West Bengal Assembly elections