मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Five State Assembly Election Results 2021) जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे, आसाममध्ये सत्ता राखली, तर पुद्दुचेरीत भाजप सत्तेत येण्याची चिन्हं आहेत तामिळनाडू-केरळात मात्र टफ फाईट आहे. अशावेळी पाच राज्यांतील भाजपच्या बड्या चेहऱ्यांचं नेमकं काय झालं? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (West Bengal Kerala Tamilnadu Assam Assembly Election Key Candidates Results 2021)
सर्वानंद सोनोवाल
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांना आसाममधील मजुली मतदारसंघातून मोठी लीड मिळाली आहे. भाजप उमेदवार सोनोवाल यांनी काँग्रेसच्या राजीव पेगू यांना मोठ्या मताधिक्याने मागे टाकले आहे.
हिमंता बिस्व सर्मा
भाजप आमदार हिमंता बिस्व सर्मा (Himanta Biswa Sarma) यांना आसाममधील जलुकबारी मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली आहे. काँग्रेसच्या रोमेन बोरठाकूर यांनी सर्मांचा नऊ हजारांच्या मताधिक्याने पराभव करण्याचा दावा केला होता, प्रत्यक्षात उलटं चित्र दिसत आहे.
सुवेंद्रू अधिकारी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दंड थोपटणारे तृणमूलचेच माजी आमदार सुवेंद्रू अधिकारी (Suvendu Adhikari) आता भाजपच्या तिकीटावर नंदिग्राममधून मैदानात आहेत. अधिकारी बॅनर्जींना कडवी झुंज देत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार ममतादीदी पिछाडीवर असून अधिकारींना किमान चार हजारांची आघाडी आहे.
स्वपन दासगुप्ता
भाजप उमेदवार स्वपन दासगुप्ता (Swapan Dasgupta) तारकेश्वर मतदारसंघातून पराभवाच्या छायेत आहेत. तृणमूलच्या रामेंदू सिंहराय यांनी दासगुप्तांना मागे टाकले आहे.
मुकुल रॉय
कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकुल रॉय (Mukul Roy) तृणमूलच्या कौशनी मुखर्जी यांना मागे टाकून भक्कम आघाडीवर आहेत.
बाबुल सुप्रियो
केंद्रीय मंत्री आणि पार्श्वगायक बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) हे टॉलिगंज मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या अरुप विश्वास यांच्याविरोधात रिंगणात उतरले आहेत. मात्र सुप्रियोंना मताधिक्य मोडण्यासाठी मोठी लीड घ्यावी लागेल
अशोक कुमार लाहिरी
प्रख्यात अर्थतज्ज्ञ अशोक कुमार लाहिरी (Ashok Kumar Lahiri) हे भाजपच्या तिकीटावर तृणमूलच्या शेखर दासगुप्ता यांच्याविरोधात बालूरघाट मतदारसंघात उतरले आहेत. लाहिरींनी दासगुप्तांना मागे टाकले आहे
ई श्रीधरन
मेट्रोमॅन अशी ख्याती असलेले भाजप उमेदवार ई श्रीधरन केरळातील पलक्कड मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परंबील यांना श्रीधरननी पिछाडीवर सोडले आहे.
अन्नमलाई
तामिळनाडूतील अरवाकुरिची मतदारसंघातील भाजप उमेदवार आयएएस ऑफिसर अन्नमलाई (Annamalai) अल्पशा मतांनी पिछाडीवर आहेत. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अन्नमलाईंनी प्रचारात स्वतःला झोकून दिलं होतं. मात्र द्रमुक उमेदवार ईलांगो आर यांनी त्यांना मागे टाकलं.
संबंधित बातम्या :
तामिळनाडूत द्रमुक आघाडीवर, केरळात डावे पुन्हा सत्तेत?
भाजपचे ग्रह फिरले, नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची आघाडी, तृणमूल काँग्रेसची जोरदार घोडदौड
(West Bengal Kerala Tamilnadu Assam Assembly Election Key Candidates Results 2021)