कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतंच एक मोठं वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगाल येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केलेले आवाहन चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र याच दरम्यान ममता बॅनर्जी यांनी आवाहन करत असतांना व्यक्त केलेल्या संशयावरून राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान सध्या रमजान महिना सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा करा असं आवाहन हिंदू बांधवांना केलं आहे. इतकंच काय राज्यात शांतता टिकून राहावी यासाठी काही भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहे.
पूर्व मेदिनीपूरमधील खेजुरी येथे सभेत बोलत असतांना ममता बॅनर्जी हे आवाहन केले आहे. याच दरम्यान रामनवमी होऊन काही दिवस उलटले तरीही यात्रा काढली जात असल्याने दंगलीचा संशय व्यक्त केला आहे.
प्रभू श्री रामाला समर्पित असलेल्या रामनवमी उत्सवानंतर अनेक दिवसांनी मिरवणूक काढण्याचे कारण काय? हिंसाचार भडकावण्याचा आणि तणाव निर्माण करण्याचा यामागील डाव असण्याची शक्यताही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
रामनवमी नंतर तब्बल पाच दिवसांनी मिरवणूक काढली जात आहे. आमचा मिरवणुकीवर आक्षेप नाही. पण ते बंदुका आणि बॉम्ब घेऊन किंवा पोलिसांच्या आवश्यक परवानगीशिवाय मिरवणूक काढू शकत नाहीत असा इशाराच भाजपचे नाव घेता दिला आहे.
जाणूनबुजून हिंसाचार भडकवण्यासाठी आणि तणाव निर्माण करण्यासाठी मुस्लिम भागात प्रवेश करत आहे. ते गरिबांच्या अन्नाच्या गाड्या पेटवत आहेत. शस्र घेऊन फिरत आहे. त्यामुळे 6 एप्रिलला म्हणजेच हनुमान जयंतीला पुन्हा हिंसाचार करण्याची शक्यता असल्याचा आरोप केला आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलिसांना याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचे सांगत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ही गंभीर परिस्थिती बंगाल मध्येच नाही तर संपूर्ण देशात निर्माण होत आहे.
कुणालाही हिंसाचार नाकी आहे. पोलिसांना याबाबत सूचना केल्या आहेत पान नागरिकांनी सतर्क राहावे. अल्पसंख्यांक भागात हिंदू बांधवांनी संरक्षण द्यावे असेही आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
बंगालमधील काही भागात मनाई आदेश आहे. काही ठिकाणी इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता परिस्थिती नियंत्रणात आल्याचे बॅनर्जी म्हणाल्या आहेत. याशिवाय परिस्थिती नियंत्रणात आल्यावर नियम शिथिल केले जाणार असल्याचे म्हंटले आहे.
याशिवाय या हिंसाचारात काही राजकीय कार्यकर्ते जखमी झाले आहेत. आत्तापर्यन्त रामनवमीच्या यात्रेत हल्ला केलेल्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपकडून ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले जात आहेत.
एकूणच पश्चिम बंगालमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी हिंसाचाराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपचे नाव न घेता केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.