इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी बोल शोषणाचा मुद्दा तापवला खरा, पण त्यात एक चूक केली. त्यांनी त्यासाठी आशिया हा शब्द योजला. हीच चूक त्यांना चांगलीच भोवली. त्यावरून एकच वादळ उठलं आहे. इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या एका शब्दावरून सध्या आशियात काहूर माजलं आहे. ग्रुमिंग गँग या शब्दावरून त्यांना देशातच नाही तर जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. सोशल मीडिया एक्सवर आता वादळ आलं आहे. नेमका काय आहे हा वाद?
उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल
लहान मुलांचं विशेषतः मुलींचे शोषण करण्यात आशियातील लोक असतात असा काहीसा सूर ब्रिटिश पंतप्रधानांनी आवळताच, त्यावरून एकच वादळ उठलं. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला. असे गुन्हा आशियातील पाकिस्तानात होतात आणि इतर देशात सुद्धा होणार्या अनेक गुन्ह्यात पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्याचे उघड झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला. त्याला अब्जाधीश एलॉन मस्क याने सुद्धा सहमती दर्शवली.
ही पाकिस्तानी ग्रुमिंग गँग
या वादावर उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोठे वक्तव्य केले. अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांनी त्यांचे समर्थन केले. प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली. ही एशियन ग्रुमिंग गँग नाही तर पाकिस्तानची ग्रुमिंग गँग असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
Repeat after me, they aren’t ASIAN Grooming Gangs but PAKISTANI grooming gangs.
Why should Asians take the fall for one absolute rogue nation?
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) January 8, 2025
त्यांच्या या पोस्टवर एलॉन मस्क यांनी ‘True’ असे लिहित त्याचे समर्थन केले. प्रियंका चतुर्वेदी यांनी ब्रिटिश पंतप्रधानांना एका देशाच्या चुकीसाठी संपूर्ण आशियायी समुदायाला दोषी का ठरवता? असा सवाल केला.
कीर स्टार्मर यांच्या वक्तव्याने किरकिर
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी एक वक्तव्य केले. त्यानुसार, 2008 ते 2013 या दरम्यान ते क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिसचे (CPS) प्रमुख होते. त्यावेली आशियन ग्रुमिंग गँगविरोधात त्यांनी पहिला खटला दाखल केला होता. विरोधी कंझर्व्हेटिव्ही पक्षाने उत्तर इंग्लंडमध्ये काही दशकांपूर्वी लैंगिक छळाच्या गु्न्ह्यात राष्ट्रीयस्तरावर चौकशीची मागणी केली आहे. या गुन्ह्यातील अधिकाधिक गुन्हेगार, आरोपी, मदत करणारे हे पकिस्तानी नागरीक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावेळी असे 1400 गुन्हे समोर आले होते. पण पाकिस्तानवर थेट हल्ला करण्याऐवजी ब्रिटिश पंतप्रधानांनी आशियाचे नाव घेतल्याने त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे.