जगातील असे पाच देश, जीथे कधीच प्रदूषण वाढत नाही

| Updated on: Nov 20, 2024 | 4:06 PM

आज आम्ही तुम्हाला असे काही देश सांगणार आहोत, ज्या देशात प्रदूषण कधीच वाढत नाही. तेथील सरकारनं प्रदूषण नियंत्रणासाठी कडक पाऊलं उचलली आहेत.

जगातील असे पाच देश, जीथे कधीच प्रदूषण वाढत नाही
Follow us on

आपण नेहमी प्रदूषणाची आकडेवारी पाहतो. या शहरात, या देशात प्रदूषण सर्वाधिक?, हे शहर प्रदूषणात पुढे?, अशा प्रकारच्या आकडेवारी नेहमी समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही देश सांगणार आहोत. पण, या देशात प्रदूषण कमीच आहे. शिवाय प्रदूषणावर अनेक चांगल्या उपाययोजना देखील आहे. असे कोणते देश आहे जिथे प्रदूषण वाढत नाही, जाणून घ्या.

स्वीडन

स्वीडन या देशाची गणना पर्यावरण रक्षणात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये केली जाते. स्वीडन सरकारने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या देशात जीवाश्म इंधनाचा (Fossil Fuel) वापर कमी करण्यात आला आहे. त्याजागी सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि जलविद्युत (Hydropower) अशा अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांचा वापर केला जात आहे.

फिनलँड

फिनलँडनेही आपले पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात यश मिळवले आहे. या देशात वृक्षारोपण आणि पर्यावरणाचा (Ecological Balance) समतोल राखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या देशात तुम्हाला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम देखील दिसतील. फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे ग्रीन बिल्डिंग्स (Green Buildings) आणि स्मार्ट सिटीचे मॉडेल लागू करण्यात आले आहे. याठिकाणी इमारतींच्या बांधकामात ऊर्जा कार्यक्षमतेची (Energy Efficiency) काळजी घेतली जाते.

आईसलँड

आईसलँडमध्ये भरपूर नैसर्गिक संसाधने आहेत. वीज निर्मितीसाठी गरम झरे (Hot Springs) आणि भूऔष्णिक (Geothermal Energy) ऊर्जेचा वापर केला जातो. यामुळे या देशाचे कार्बन उत्सर्जन अत्यंत कमी होते. आईसलँडमधील जल आणि वायू प्रदूषणावर बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि इथले लोक पर्यावरण रक्षणाबद्दल खूप जागरूक आहेत.

न्यूझीलंड

न्यूझीलंड नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून येथील वातावरण अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे. या देशाच्या सरकारने कडक नियम आणि कायद्यांतर्गत प्रदूषण नियंत्रणाच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. येथील शेती, उद्योग आणि वाहतूक व्यवस्था पर्यावरणाला बाधा ठरणार नाही, अशा कोणत्याही प्रकारचे काम करत नाही. तसेच यावरच येथील व्यवस्था आधारित आहे.

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड देखील अशा देशांपैकी एक आहे जिथे प्रदूषण कधीच वाढत नाही. येथील सरकारने शाश्वत विकासाची तत्त्वे स्वीकारली आहेत, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते. स्वित्झर्लंडमधील ऊर्जा उत्पादनात नवीकरणीय स्त्रोतांचा मोठा वाटा आहे.

आपण हे असे देशा पाहिले आहेत, ज्या ठिकाणी प्रदूषण रोखण्यावर उपाययोजना आहेतच शिवाय कडक नियम देखील आहेत. याचे पालन केल्यानं हे देश एक प्रकारे प्रदूषणापासून दूर आहे, असंस म्हणावं लागेल.