मुंबई : पाकिस्तानातील सीमा हैदर आणि सचिनचं प्रेम प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलं आहे. या लव्ह स्टोरीच्या क्लायमॅक्सवरून आता पडदा दूर होऊ लागला आहे. सीमा हैदर चौकशीत धक्कादायक माहिती उघड करत आहे. त्यामुळे तपास यंत्रणाही आवाक् झाल्या आहेत. सीमा आणि सचिनचं प्रेमप्रकरणाबाबत टीव्ही 9 भारतवर्षने एक मोठा खुलासा केला आहे. सीमा आणि सचिन यांनी नेपाळच्या पशुनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे. सीमा आणि सचिन थांबलेल्या विनायक हॉटेमधून ही माहिती समोर आली आहे. हॉटेल मालक गणेस यांनी टीव्ही 9 भारतवर्षला ही माहिती दिली आहे.
खोली नंबर 204 मध्ये सचिनने सीमासोबत लग्न केलं असल्याचं समोरा आहे. हॉटेल मालक गणेश यांनी सांगितलं की, “सचिनने खोली बूक केली होती. सचिन नेपाळमध्ये एक दिवस आधी आला होता. त्यानंतर सीमा तिथे पोहोचली. दोघं हॉटेलमध्ये 7 दिवस थांबले. या दरम्यान एकत्र फिरायचे. दोघं जेव्हा बाहेर जायचे तेव्हा सीमा जीन्स आणि टी शर्टमध्ये असायची. त्यामुळे ती चार मुलांची आई असेल याबाबत शंका आली नाही.”
“हॉटेलच्या खोलीतच दोघांचं लग्न झालं. सचिनने सीमासोबत लग्न केलं. सीमाने पशुपतीनाथ मंदिरात लग्न केलच नाही. ती भारतातील तपास यंत्रणांना खोटं सांगत आहे.”, असंही हॉटेल मालक गणेश यांनी सांगितलं.
सीमा हैदर प्रकरणात महत्त्वाचे खुलासे होत आहे. तपास यंत्रणानी या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. सीमा भारतात येणं ह्यूमन ट्रॅफिकिंग सारखीच पद्धत असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं. यासाठी तिला ट्रेनिंग दिली असावी असा संशय तपास यंत्रणांना आहे. नेपाळमधून भारतात येण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेतली असावी, असंही तपास यंत्रणांना वाटत आहे.
सीमाला भारतात पाठवण्यासाठी त्या पद्धतीने ड्रेसअप केल्याचंही समोर आहे. इतकंच काय तर सीमा सोबत चार मुलांना यासाठी खास प्रशिक्षण दिलं असावं, असा संशय तपास यंत्रणांना आहे.