नवी दिल्ली | 23 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कने देशातील सर्वात मोठ्या सोहळ्याचं आयोजन केलं आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समीटचं टीव्ही9 ने आयोजन केलं आहे. या कॉन्क्लेव्हचं हे दुसरं पर्व आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर जगातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला संबोधित करणार आहेत. केंद्रातील अनेक मंत्रीही या सोहळ्यात आपले विचार मांडणार असून फिल्मी दुनियेतील दिग्गज कलाकारांचाही यात समावेश होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सपर्ट आणि MARZचे सीईओ जोनाथन ब्रॉन्फमॅन हे सिनेमातील एआयचं महत्त्व अधोरेखित करणार आहेत. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे समिक रॉयही या चर्चेत भाग घेणार आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या जगातील सर्वात हॉट टेक्नॉलॉजी आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे याची चर्चा सुरूच असते. जेव्हापासून चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी सारखे टुल्स आले आहेत. तेव्हापासून याची लोकप्रियता अधिक वाढली आहे. पण एआयए एवढ्यापुरतंच सीमित नाहीये. तर, उद्योग, मेडिकल, फिल्म आदी क्षेत्रातही त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर होत आहे. आता आम्ही तुम्हाला जोनाथन ब्रॉन्फमॅ आणि समिक रॉय यांच्याबाबत सांगत आहोत.
जोनाथन ब्रॉफमॅन हे कॅनडाचे प्रसिद्ध सिने निर्माते आणि मॉन्स्टर्स एलिअन्स रोबोट्स जॉम्बीज (MARZ) VFXचे सीईओ आहेत. त्यांची कंपनी सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि VFX चा वापर करण्याचं काम करते. त्यांनी मॅकगिल विद्यापीठातून बीकॉम केलं आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या स्टेजवरून जोनाथन हे व्हिज्युअल इफेक्ट आणि कंटेट क्रिएशनमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भूमिकेवर भाष्य करणार आहेत.
या इव्हेंटमध्ये जोनाथन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हायक्वालिटी टीव्ही कंटेट प्रोड्यूस करण्याचा मंत्र देणार आहेत. मनोरंजन आणि मीडिया उद्योगातील लोकांना सध्याच्या काळात VFX ला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कसे चांगले करता येईल हे समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
समिक रॉय हे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कार्यकारी संचालक (कार्पोरेट, मीडिया आणि स्मॉल बिझनेस) म्हणून कार्यरत आहेत. टेक्नॉलॉजी आणि बिझनेस स्ट्रॅटेजीचे सखोल ज्ञान असण्याबरोबरच लेटेस्ट डिजीटल सोल्शून्सच्यासह लेव्हलच्या एंटरप्रायजेसला सशक्त करण्याचं काम करतात. समिक यांची कुशल लीडशीप आणि दूरदृष्टीकोण यामुळे संपूर्ण भारतात बिझनेससाठी डिजीटल ट्रान्स्फॉर्मेशन, प्रॉडक्टिव्हिटी आणि कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या प्रयत्नांना वाव देत आहेत. सर्वसमावेशी विकासासाठी तंत्रज्ञानाचा लाभ उठवण्याची त्यांची प्रतिब्धता दर्शविते.