नवी दिल्ली : भारताला समान नागरी कायद्याची गरज नसल्याचे मत असदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी देशाची संस्कृती आणि विविधतेवर भर देत देशाची विविधताही सांगितली. या विविधतेमुळे भारत सुंदर बनला असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. TV9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये (What India Thinks Today Global Summit) ते बोलत होते. या ग्लोबल समिटमध्ये बोलतानाही त्यांनी गोवा राज्याविषयी सांगताना म्हणाले की, गोव्यात जो पुनर्विवाहाचा कायदा करण्यात आला आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुले भारत एक सुंदर देश बनला असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी त्यांना असे विचारण्यात आले की, तुम्ही मुस्लिम समाजाचे नेते आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले की, मी गरीब आणि शोषितांची सेवा करणार नेता असल्याचे सांगितले.
तसेच असदुद्दीन ओवेसी हे मुस्लिमांचे नेते नाहीत आणि ते मुस्लिमांचे नेते कधीही होणार नाहीत. हे सांगत असतानाच त्यांनी ओवेसी हे हैदराबादमधून जनतेच्या पाठिंब्यावर विजयी झाले असून ते गरीब आणि शोषितांची सेवा कायम करत राहतील. याबरोबरच मी अल्लाहच्या नावाने शपथ घेतली असून भारताशी एकनिष्ठ राहण्याची, शपथ घेतली आहे.
TV9 ग्लोबल समिटमध्ये बोलताना त्यांना बेरोजगारी प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले की, देशाचे सरासरी वय हे सुमारे 25 वर्षे आहे, त्यामुळे बेरोजगारी ही एक येथील मोठी समस्या असल्याचेही त्यांनी सांगितले. चीनकडूनही आता घूसखोरी केली जात असून वर्षभरापासून ते भारताच्याच भूभागावर ठाण मांडून बसले आहेत.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्यावरील आक्षेपार्ह विधानांबद्दलच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट करत ते इतर देशांतील शेख लोकांसमोर कसं नतमस्तक होतात हे दाखवून दिले.तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यावर आम्ही 29 रोजीच गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरेबियाच्या शेख लोकांसमोर का नतमस्तक होतात असा पंतप्रधानांना सवाल केला पाहिजे असंही त्यांनी सांगितले.
सांप्रदायिक दोषांच्या आधारे भारताचे विभाजन झाले आहे का असा सवाल त्यांना करण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले की, सत्तेत असलेले भाजप भारतातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याकांविरूद्ध अगदी जाहीरपणे युद्ध करत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी प्रयागराजचे उदाहरण देऊन त्यांनी तेथील शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या गैरप्रकारानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी एका कुटुंबाला वेठीस कसे धरले आणि त्यांचे घर कसे पाडले व त्याच गल्लीतील आणखी नऊ घरे तशीच कशी शाबूत राहिले याचे उदाहरणही त्यांनी दिले. तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांच्या मुलाने जाणीवपूर्वक लोकांच्या अंगावर गाडी घालून हत्या केली तरी अशा लोकांना कोणतीही शिक्षा होत नाही अथवा सरकार त्यांच्याविषयी कोणतीही भूमिका घेत नाही. त्यामुळे हे द्वेषाचे राजकारण नाही का असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.
यावेळी ओवेसी यांनी सांगितले की, भाजप सरकारकडून राज्यघटनेकडे दुर्लक्ष केले जात असून राज्यघटनेवरच बुलडोझर चालवण्याचे काम केले जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी प्रयागराजमधील घटना सांगत त्यांनी कायदा सुव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेवरही बोट ठेवले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोणताही मुख्यमंत्री न्यायालयाच्या न्यायधीशांप्रमाणे वागू शकत नाही, आणि असलेल्या कायद्याला समांतर व्यवस्था निर्माण करू शकत नाही. एखादी व्यक्ती कायद्याने दोषी असेल तर त्या व्यक्तीला न्यायालय शिक्षा देते, मात्र त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबालाच कोणीही शिक्षा देऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रकारचे कायदे कोठेही अस्तित्वात नाहीत, आणि कोणाचेही घर पाडण्याचे, तोडण्याचे अधिकार कोणीही कोणाला दिले नाहीत.