What India Thinks Today | ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ चा दुसरा दिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू!

| Updated on: Feb 26, 2024 | 9:42 AM

What India Thinks Today | 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' च्या ग्लोबल समीटमध्ये आज सिनेमा, अर्थव्यवस्था आणि संस्कृती विषयावर सत्र होतील. तर 27 फेब्रुवारी रोजी 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' मध्ये सत्ता संमेलनात राजकीय विचारांची फोडणी बसेल. यामध्या राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर गंभीर चर्चा होईल.

What India Thinks Today | व्हॉट इंडिया थिंक्स टुडे चा दुसरा दिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू!
Follow us on

नवी दिल्ली | 26 February 2024 : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समीट 2024 च्या दुसऱ्या दिवशी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होतील. राजधानी दिल्लीत होणाऱ्या ग्लोबल समिटमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट सहभागी होतील. याशिवाय परदेश मंत्री एस. जयशंकर आणि अभिनेता आयुष्मान खुराना आणि कंगना राणावत यांच्यासह इतर अनेक प्रतिष्ठीत सहभागी होतील. टीव्ही9 च्या या वार्षिक उत्सवात देशातील राजकीय आणि सध्याच्या जागतिक घाडमोडींवर चर्चा होईल. सोबतच क्रीडा, मनोरंजन आणि अर्थजगतातील अनेक दिग्गज त्यांचे विचार मांडतील.

टीव्ही9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ चे संमेलन 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत सुरु आहे. India: Poised For The Next Big Leap या संकल्पनेवर हे विचारपुष्प विणण्यात आले आहे. ग्लोबल समीटच्या या मंचावर आज 26 फेब्रुवारी रोजी सिनेमा, आरोग्य, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीशी संबंधित महत्वपूर्ण सत्र होतील.

तर 27 फेब्रुवारी रोजी ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ संमेलनात सत्ता संमेलन सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. यामध्ये देशातील राजकीय सध्यस्थिती आणि लोकसभा निवडणुकीवर जोरदार चर्चा पाहायला मिळेल. नवीन भारताची गॅरंटी-2024 ही सत्ता संमेलनाची थीम आहे. ग्लोबल समीटच्या दुसऱ्या दिवशी (सोमवार) आणि मंगळवार (27 फेब्रुवारी) रोजी अनेक दिग्गज सहभागी होत आहे.

हे सुद्धा वाचा

ग्लोबल समीट : 26 फेब्रुवारी, 2024, दुसरा दिवस

9.00 AM – टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे स्वागतपर भाषण

9.10 AM – ग्लोबल कीनोट एड्रेस- ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट

9.50 AM – विषय – युद्धाचे युग नाही : वैश्विक शांती उत्प्रेरक म्हणून भारताचा उदय

– वेलिना चाकारोवा, भूराजनीतिक रणनीतिकार आणि संस्थापक, FACE

– मारिया अहमद दीदी, मालदीव गणराज्याची माजी संरक्षण मंत्री

– सैयद अकबरुद्दीन, संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधि

10.35 AM – AI: वचन आणि संकटे

– अशोक शुक्ला, संचालक AI व्हिजन, सॅमसंग रिसर्च

– प्रा.अनुराग मायरा, स्टॅनफोर्ड प्रो. बायोटेक, AI मध्ये स्पेशलायझिंग

– शैलेश कुमार, चीफ डेटा सायंटिस्ट, सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय/एमएल, रिलायन्स जिओ

– समिक रॉय, कार्यकारी संचालक, कॉर्पोरेट, मध्यम आणि लघु व्यवसाय, मायक्रोसॉफ्ट इंडिया

– जोनाथन ब्रॉन्फमन, उद्योजक आणि चित्रपट निर्माता, सह-अध्यक्ष मार्झ

11.10 AM – नारी शक्ती: ड्रायव्हिंग मिशन ‘विकसित’ भारत या विषयावर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या संवाद साधतील

11.40 AM – फिनटेक 3.0 : आव्हाने आणि संधी या विषयावर भारतपेचे चेअरमन आणि एसबीआयचे माजी चेअरमन रजनीश कुमार यांची मुलाखत होणार आहे.

12.00 AM – विषय- स्टार्टअप, भारत: स्केल अप आणि सस्टेन

– सुषमा कौशिक, संस्थापक भागीदार, 108 कॅपिटल

– ग़ज़ल अलघ, सह-संस्थापक, मामाअर्थ

– अखिल गुप्ता, सह-संस्थापक आणि CTO, नोब्रोकर

– जयेन मेहता, एमडी, अमूल

12.40 PM – जेवणाची वेळ

01.20 PM – FIRESIDE CHAT- नव्या भारतासाठी सिनेमा या विषयावर अभिनेते आयुष्मान खुराना बोलणार आहेत.

01.50 PM – इंइन्फ्रा, गुंतवणूक आणि IT: भारताची 3I अनिवार्यता या विषयावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मुलाखत घेतली जाणार आहे.

02.20 PM – FIRESIDE CHAT | चार्टिंग द ग्रोथ ट्रॅजेक्टरी फॉर इंडियाज एफएमसीजी इंडस्ट्री या विषयावर झायडूस वेलनेसचे सीईओ तरुण अरोरा हे संवाद साधणार आहेत.

02.40 PM –विषय : एका न्यायसंगत बोर्ड रुमची गरज

– मनेका गुरुस्वामी, वरिष्ठ वकील, सर्वोच्च न्यायालय

– विनीता सिंह, सहसंस्थापक आणि सीईओ शुगर कॉस्मेटिक

– पल्लवी श्रॉफ, शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार

– रितुपर्णा चक्रवर्ती, टीमलीज सर्व्हिसेस लिमिटेडच्या सह-संस्थापक

– डॉ. श्रीनाथ श्रीधरन, पॉलिसी रिसर्चर आणि कॉर्पोरेट सल्लागार

03.20 PM – विषय : सेटिंग द रेकॉर्ड स्ट्रेट

– साल्वाटोर बेबोन्स, समाजशास्त्रज्ञ आणि लेखक, सिडनी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक

– विक्रम संपत, इतिहासकार आणि लेखक

– सलमान खुर्शीद, भारताचे माजी परराष्ट्र मंत्री

– मिली अश्वर्या, वरिष्ठ प्रकाशक, पेंग्विन रँडम हाऊस इंडिया

04.00 PM – FIRESIDE CHAT | सस्टेनिंग द मोमेंट अँड मोमेंटम या विषयावर मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव हे बोलतील.

04.30 PM – FIRESIDE CHAT | कॅब्रिटिंग द कन्स्मप्शन कोनंड्रम या विषयावर महिंद्रा अँड महिंद्राचे सीईओ आणि एमडी डॉ. अनिश शाह बोलणार आहेत.

05.00 PM – FIRESIDE CHAT | क्रिएटीव्ह : वर्ल्ड इज माय ऑयस्टर या विषयावर अभिनेत्री कंगना राणावत बोलणार आहे.

05.25 PM – विषय – बेटिंग ऑन इंडिया : द मायक्रो व्ह्यू

– जोडी मॅके, ऑस्ट्रेलिया-इंडिया बिझनेस कौन्सिलचे संचालक आणि माजी विरोधी पक्षनेता, ऑस्ट्रेलिया सरकार

– मुकेश अघी, अध्यक्ष आणि सीईओ, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम

– निलेश शहा, कोटक म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक

– अँड्र्यू हॉलंड, सीईओ, अव्हेंड्स कॅपिटल अल्टरनेट स्ट्रॅटेजीज

– डॉ. संजीव सन्याल, सदस्य, पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद (EAC-PM)

06.10 PM – FIRESIDE CHAT : टेलविंड्स फॉर इंडिया या विषयावर जनरल ॲटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी डॉ. विवेक लाल हे संवाद साधतील.

06.35 PM –द राईज ऑफ द ग्लोबल साऊथ या विषयावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची मुलाखत होणार आहे.

08.00 PM – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुख्य भाषण