नवी दिल्ली | 26 February 2024 : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिट 2024 ची धडाक्यात सुरुवात झाली. अनेक मान्यवरांनी त्यांचे विचारपुष्प गुंफले आहे. त्यांच्या नवनवीन कल्पनांनी, विचारांनी नवीन आयाम समोर आले आहेत. विचारांची भूक भागविणारे हे समिट अनेक अंगांनी वैचारिक खाद्य पुरविणारे ठरले आहे. या संमलेनाचा आज दुसरा दिवस, आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. . ते विकसित भारताचं स्वप्न या विषयावर बोलणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारताचा जागतिक पटलावर डंका वाजत आहे. त्यापार्श्वभूमीवर हे भाषण विचारांची शिदोरी ठरेल.
‘मोदी है तो गारंटी है’
अर्थात सध्या सर्वदूर ‘मोदी है तो गारंटी है’, हा हुंकार भाजप, नेते आणि दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भरताना दिसत आहे. सत्ता संमेलनात याच विषयावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांची बाजू मांडतील. मोदी सरकारने गेल्या 10 केलेल्या विविध कामाचा लेखाजोखा, कल्याणकारी योजनांची उजळणी या मंचावरुन होईल. लोकसभेचा बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष सध्या पक्षाची ध्येयधोरणे मांडत आहे. केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान याविषयी भूमिका मांडतील.
पंतप्रधानांचं मुख्य भाषण
संध्याकाळी विकसीत भारताचे स्वप्न यावर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण ऐकणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते विकसित भारताचं स्वप्न या विषयावर बोलणार आहेत.
अमित शाह पण होतील सहभागी
तीन दिवस चालणाऱ्या कॉनक्लेव्हमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीएम अरविंद केजरीवाल, एलजी मनोज सिन्हा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सारखे दिग्गज नेता सहभागी होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर पण सहभागी होतील. नवीन भारताच्या जगरहाटीत हरियाणाचे योगदान काय याची भूमिका मांडणार आहेत.