नवी दिल्ली | 26 February 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी चार चांद लावले. त्यांच्या उत्साहपूर्ण, आवेशपूर्ण भाषणाने एकच जोश भरला. पंतप्रधानांनी चौफेर फटकेबाजी केली. काँग्रेसला चिमटे काढतानाच, भविष्यातील मोदी सरकारचा रोडमॅपही त्यांनी दाखवला. भारताच्या विकासाचे चाक जोमाने फिरत आहे. भारत हा जगाचा केंद्रबिंदू कसा ठरत आहे. त्यामागची कारणमीमांसा त्यांनी केली. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व मोदी सरकार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदींचा विकासाचा रोडमॅप
गरिबी सिंगल डिजिट
भारतात कन्झम्प्शनबाबतचा रिपोर्ट आला आहे. त्यातून नवा ट्रेंड कळतो. भारतातील गरिबी आता सिंगल डिजीटला आली आहे. या डेटा नुसार कन्झम्प्शन अडीच टक्के वाढलं आहे. गेल्या दहा वर्षात गावात कन्झम्प्शन अधिक वाढलं आहे. म्हणजे गावातील लोकांचं आर्थिक सामर्थ वाढत आहे. हे असंच झालं नाही. २०१४ नंतर आम्चया सरकारने गावाला समोर ठेवून इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं. महिलांचं उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केला. विकासाच्या या मॉडेलमुळे भारत सशक्त झाला आहे.
कुटुंबांची क्रयशक्ती वाढली
पूर्वी ज्या कुटुंबाची संपूर्ण शक्ती अन्न मिळवण्यात जात होती. आज त्यांचे सदस्य सर्व वस्तूंवर पैसे खर्च करत आहेत. पूर्वीचे सरकार देशातील जनतेला अभावात ठेवायचे. अभावत राहिलेल्या लोकांना निवडणुकीत थोडंफार द्यायचे. त्यातून व्होट बँकचं राजकारण सुरू झालं. जे मतदान करायचे त्यांच्यासाठीच सरकार काम करत होते. आम्ही हा माइंडसेट सोडला. आम्ही विकासाचा लाभ सर्वांना समान द्यावा हे ठरवलं. आम्ही तुष्टीकरण केलं नाही. आम्ही देशावासियांच्या संतुष्टीकरणाचा मार्ग निवडला. गेल्या १० वर्षातील आमचा हाच एक मंत्र आहे, हाच आमचा विचार आहे. आम्ही वोट बँक पॉलिटिक्सला पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्समध्ये बदल्याचे त्यांनी सांगितले.
युपीआयसह विज्ञानाचा झेंडा
भारत आज ग्लोबल वर्ल्डमध्ये डिजीटल पेमेंट करणारा सर्वात मोठी ताकद आहे. भारत चंद्रमाच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश आहे, फायजीमध्ये युरोपलाही मागे टाकलं आहे. आज भारत उज्वल भविष्यासाठी मेहनत करत आहे. भारत भविष्याकडे पाहत आहे. म्हणूच लोक म्हणत आहेत इंडिया इज फ्युचर. त्यामुळे येणारे पाच वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आपल्याला भारताच्या सामर्थ्याला नव्या उंचीवर न्यायचं आहे. विकसीत भारताची प्रगती करायची आहे. हे प्रगती आणि प्रशस्तीचं काम आहे. तुम्ही बिग लीपचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे मलाही माझी लीप उघडायला संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.