नवी दिल्ली | 26 February 2024 : भारताने गेल्या दहा वर्षात मोठी झेप घेतली. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताने आता पाचवे स्थान मिळवले आहे. तर लवकरच भारत तिसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. भारताने या दहा वर्षात सर्वच बाबतीत आघाडी उघडली आहे. भारत जगाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या बदला मागचा प्रपंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलगडला. TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी देशाचा कायापलटच जगासमोर ठेवला.
टीव्ही9 वर कौतुकाचा वर्षाव
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात टीव्ही9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि उपस्थितांना नमस्कार करुन केली. “मी नेहमीच भारताच्या डायव्हर्सिटीची चर्चा करतो. या डायव्हर्सिटीला टीव्ही9च्या न्यूज रुममध्ये दिसून येते. टीव्ही9च्या अनेक भारतीय भाषात तुम्ही भारताची व्हायब्रंट लोकशाही त्याचे प्रतिनिधीही आहात. मी विविध राज्यात, विविध भाषेत टीव्ही9 मध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकारांचा, तुमच्या टेक्निकल टीमचं अभिनंदन करतो. आपल्या इथे जुन्या काळात युद्धात जाण्यापूर्वी जोरात शंख वाजवला जायचा कारण जाणारा जोशात जावा.” या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे आभार मानले.
मन के हारे हार है, मन के जीते जीत है
भारताच्या प्रगतीचे कारण मीमांसा करताना, ज्याचा मनात उमेद आहे. तो विजय होतो, ज्याच्या मनात जोश आहे, तो काहीतरी घडवून दाखवतो, असा मंत्र पंतप्रधानांनी दिला. “मित्रांनो, आज टीव्ही9च्या टीमने या समीटसाठी मोठा इंटरेस्टिंग टॉपिक निवडला आहे. बिग लीप तर आम्ही तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण जोशात असू. ऊर्जाने भरलेलो असेल. कोणी हताश, निराश देश असो की व्यकीत बिग लीपच्या बाबत विचार करू शकत नाही. ही थीमच सर्व सांगण्यासाठी पुरेशी आहे की, आजच्या भारताचा आत्मविश्वास किती उंचावर आहे. आकांक्षा काय आहेत. आज जगाला वाटतंय भारत एक मोठी झेप घ्यायला तयार आहे. तर त्याच्या पाठी दहा वर्षाचा पॉवर फुल लॉन्च पॅड आहे. दहा वर्षात असं काय बदललं. की आज आम्ही इथपर्यंत आलोय. हा बदल माइंडसेटचा आहे, हा बदल सेल्फ कॉन्फिडन्स आणि ट्र्स्टचा आहे. हा बदलाव गुड गव्हर्नेन्सचा आहे. एक जुनी म्हण आहे, मन के हारे हार है, मन के जीते जीत है.” या सोप्या शब्दात त्यांनी दहा वर्षांतील यशोगाथा उलगडली.