WITT 2024 : हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरी ते ड्रोन दीदीपर्यंत… पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी काय-काय केलं, स्मृती ईराणी यांचा खुलासा

| Updated on: Feb 26, 2024 | 3:21 PM

टीव्ही9 नेटवर्कने 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट'चं आयोजन केलं आहे. या ग्लोबल समीटच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणीदेखील सहभागी झाल्या. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केलं. नरेंद्र मोदी असे पहिले मुख्यमंत्री होते, ज्यांनी महिलांची डिलीव्हरी हॉस्पिलमध्येच होईल हे सुनिश्चित केलं असं स्मृती ईराणी म्हणाल्या. महिलांची ताकद ओळखून त्यांना एका वेगळ्या उंचीवर (नरेंद्र मोदी ) त्यांनी नेलं असंही स्मृती ईराणी यांनी नमूद केलं.

WITT 2024 : हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरी ते ड्रोन दीदीपर्यंत...  पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी काय-काय केलं, स्मृती ईराणी  यांचा खुलासा
Follow us on

नवी दिल्ली | 26 फेब्रुवारी 2024 : देशातील नंबर-1 न्यूज नेटवर्क टीव्ही9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ‘या ग्लोबल समिटचा आजचा दुसरा दिवस आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी ‘नारी शक्ति विकसित भारत’ या विषयावर मत मांडलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांसाठी अनेक कामं केली, असं त्या म्हणाल्या. सुमारे, 20 वर्षांपूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी हे सुनिश्चित केलं की महिलांची डिलीव्हरी (प्रसूती) हॉस्पिटलमध्येच होईल. पंतप्रधान मोदी यांनी महिलांची क्षमता ओळखली आणि त्यांना एक वेगळी ओळख (मिळवून) दिली, असेही स्मृती ईराणी म्हणाल्या.

त्यांनी महिलांना अर्थव्यवस्थेत समान भागीदार बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे अनेक कार्यक्रम आणले, राबवले जे महिलांच्या हिताचे आहेत आणि त्यामुळे त्यांना बळ मिळू शकले, असे ईराणी म्हणाल्या. ‘लखपती दीदी’ ते ‘ड्रोन दीदी’ पर्यंत अनेक योजनांचा यावेळी स्मृती ईराणी यांनी उल्लेख केला. नरेंद्र मोदीजी हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून काम करत असताना, ते पाहण्याचं, अनुभवण्याचं भाग्य मला मिळालं, असेही केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी म्हणाल्या.

पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उभ्या

आज लोक पंतप्रधान मोदींना जागतिक नेता म्हणून पाहतात, मानतात, असे ईराणी म्हणाल्या. पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा उल्लेख करताना स्मृती इराणी म्हणाल्या की, या योजनेमुळे महिलांना नवी ऊर्जा मिळाली आहे. सुमारे साडेतीन लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत, चालत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. देशाच्या संरक्षणासाठीही महिलाही योगदान देत आहेत. भारताच्या स्त्रीशक्तीचे वैभव जगाने पाहिले आहे. आज भारतातील महिला जगात आपला झेंडा अभिमानाने फडकावत आहेत, असेही स्मृती ईराणी यांनी नमूद केलं.

रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदीचं मुख्य भाषण

‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ हा ग्लोबल समिट कार्यक्रम 27 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. India: Poised For The Next Big Leap अशी या कॉन्क्लेव्हची थीम आहे. आजच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशिवाय अनेक मान्यवर सहभागी झाले. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना आणि कंगना राणौत यांचा समावेश आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज रात्री 8 वाजता या समिटमध्ये सहभागी होणार आहेत.