नवी दिल्ली | 24 February 2024 : टीव्ही 9 नेटवर्क आपला वैचारिक मंच व्हाट इंडिया थिंक्स टुडेच्या (What India Thinks Today) माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या कॉनक्लेव्हमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीएम अरविंद केजरीवाल, एलजी मनोज सिन्हा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सारखे दिग्गज नेता सहभागी होत आहे. व्हाट इंडिया थिंक्स टुडेच्या तिसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी ‘सत्ता सम्मेलन’ मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर पण सहभागी होतील. नवीन भारताच्या जगरहाटीत हरियाणाचे योगदान काय याची भूमिका ते मांडतील.
मनोहर लाल खट्टर भूमिका मांडणार
व्हाट इंडिया थिंक्स टुडेच्या ‘सत्ता संमेलनात’ भारतीय जनता पक्षाचे हरियाणातील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे नवीन भारताची गॅरंटी याविषयावर भूमिका मांडतील. गेल्या दहा वर्षांपासून खट्टर यांची सत्ता आहे. त्यांच्या काळात हरियाणाने काय साध्य केले आणि अजून कोणता पल्ला गाठायचा आहे, याविषयची भूमिका ते मांडतील. देशाच्या विकासात हरियाणाचे योगदान काय, हे ते समजावून सांगतील.
लोकसभेसह विधानसभेची तयारी
LG मनोज सिन्हा बदलत्या काश्मीरवर भाष्य करतील
हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांच्यांशिवाय 6 इतर राज्यातील मुख्यमंत्री पण सत्ता संमेलनात सहभागी होतील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय या वैचारिक मंचावर भूमिका मांडतील. राज्यातील घडामोडी, नवनवीन योजना आणि राज्यांच्या विकासाबाबत मत मांडतील.
सत्ता संमेलनात जम्मू-काश्मिरचे एलजी मनोज सिन्हा
सत्ता संमेलनात जम्मू-काश्मिरचे एलजी मनोज सिन्हा हे बदलत्या राज्याची कहाणी मांडतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे भारतीय सैन्यदलाची वीरता, शौर्यगाथेविषयी माहिती देतील. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पण सत्ता संमेलनात सहभागी होतील. त्यांच्या विचारासह या कॉनक्लेव्हचा समारोप होईल.