तुम्ही अनेक वाहनांवर BH नंबरची नेम प्लेट पाहिली असेल, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, ही नंबर प्लेट नेमकी कुणाला मिळते, यासाठी पात्रता काय आहे, तसेच निकष काय आहेत. याचविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तसेच BH नंबर प्लटचे फायदे आणि तोटे देखील सांगणार आहोत. याविषयी खाली सविस्तर जाणून घ्या.
एखाद्या राज्याची कार रस्त्यावर उतरली तर त्याच्या सुरुवातीच्या अंकावरून ती कार कोणत्या राज्याची आहे हे कळते. उदाहरणार्थ, जर वाहनाचा सुरुवातीचा अंक डीएल असेल तर वाहन दिल्लीचे आहे. एमपी असेल तर गाडी मध्य प्रदेशातील आहे. त्याचप्रमाणे पहिले दोन आकडे कार ज्या राज्यातील आहेत त्या राज्यासाठी असतात.
पण आता भारतातही BH नंबरची नेम प्लेट उपलब्ध आहे. रस्त्यावर धावणाऱ्या अनेक वाहनांमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल. BH नंबर प्लेट बसवण्याचे फायदे काय आहेत? त्यासाठी ची संपूर्ण प्रक्रिया काय आहे? याविषयी जाणून घ्या.
BH नंबर प्लेट कोणाला मिळते?
BH नंबर प्लेट निवडक लोकांनाच उपलब्ध आहे. यासाठी सर्व जण अर्ज करू शकत नाहीत. BH नंबर प्लेटसाठी केवळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे कर्मचारीच अर्ज करू शकतात. याशिवाय संरक्षण क्षेत्रात काम करणारे कर्मचारीही यासाठी अर्ज करू शकतात.
बँक कर्मचाऱ्यांना BH नंबर प्लेटही मिळू शकते. प्रशासकीय सेवेतील कर्मचारीही यासाठी अर्ज करू शकतात. तर त्याचबरोबर चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे कर्मचारीही यासाठी अर्ज करू शकतात.
BH क्रमांक कसा मिळवावा?
BH नंबर प्लेट मिळवण्यासाठी सर्वप्रथम एमओआरटीएचच्या वाहन पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यानंतर फॉर्म 20 भरावा लागेल. त्याच खासगी फॉर्मच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 भरावा लागणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या दाखल्यासोबत एम्प्लॉई आयडीही द्यावा लागेल. त्यानंतर राज्य प्राधिकरण मालकाच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार आहे.
यानंतर तुम्हाला सीरिज प्रकारातून BH सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर कागदपत्रे सादर करावी लागतील. आरटीओ कार्यालयातून BH सीरिजला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. यानंतर तुमच्या वाहनासाठी BH सिरीज नंबर जनरेट होईल.
BH नंबर प्लेटचे फायदे की तोटे?
BH नंबर प्लेट बहुतेक त्या लोकांसाठी फायदेशीर असते. ज्यांना नोकरीमुळे सतत प्रवास करावा लागतो. एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागतं. अशा लोकांना BH नंबर घेतल्यास फायदा होतो. दुसऱ्या राज्यात गेल्यावर त्यांना पुन्हा वाहनाची नोंदणी करावी लागत नाही. कारण BH नंबर प्लेट ऑल इंडिया वैध आहे. हे वाहन भारतात कुठेही नेले जाऊ शकते. त्याचा एकच तोटा आहे की, तो सर्व लोकांना उपलब्ध होत नाही. वाहतुकीच्या वाहनांनाही त्याचा वापर करता येत नाही.