डार्क टुरिझम म्हणजे काय ? केरळ पोलिसांनी काय दिला इशारा ?

| Updated on: Aug 04, 2024 | 7:40 PM

लोकांना भूतकाळात रमायला आवडते. त्यामुळे जेथे जास्त मृत्यू झाला असेल, मोठे संकट आले असेल किंवा युद्ध झाले असेल, युद्धात मोठा पराभव झाला असेल तेथे लोकांना फिरायला आवडते.

डार्क टुरिझम म्हणजे काय ? केरळ पोलिसांनी काय दिला इशारा ?
WAYNAD KERALA
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यामध्ये बुधवारी दरड कोसळून तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकारानंतर केरळ पोलिसांनी पर्यटकांना आवाहन केले आहे. पोलिसांना आता वायनाडमध्ये डार्क टुरिझमची भीती वाटत आहे. वायनाड येथे 30 जुलैच्या मध्यरात्री वायनाड येथे ढगफूटी सदृश्य पाऊस झाला आणि रात्री अचानाक एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान डोंगरावरुन माती आणि चिखलाचा मोठा ढिगारा खाली सरकत आला आणि त्यात अख्खा गावच गाडला गेला. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी जोरदार मोहिम सुरु असून आता केरळ पोलिसांना आता डार्क पर्यटन घडण्याचा धोका वाटत आहे.

डार्क टुरिझम म्हणजे काय ?

अलिकडे डार्क टुरिझमचे फॅड वाढले आहे. कारण लोकांना जेथे मृत्यू झाला अशा ठिकाणी जायला आवडते. चेर्नोबिल आणि द डार्क टुरिस्ट सारख्या टीव्ही शोमुळे डार्क टुरिझम ही संकल्पना प्रसिद्धीस आली आहे. मृत्यू , दु:ख, शोकांतिका, हिंसा आणि असामान्य विचित्र घटना घडलेल्या ठिकाणांवर जाण्यास लोकांना आवडते. त्यामुळे आपल्या येथे जेथे जालियनवाला बाग, अंदमान, समाधी, दुघर्टना झाल्याचे ठिकाण, युद्धभूमी, स्मारके, तुरुंग, फाशीची ठिकाणे आणि गुन्हे घडलेली ठिकाणी लोकांना जायला आवडते. काही जण स्मशान भुमीत देखील जात असतात. यालाच डार्क टिरिझम म्हटले जाते.

केरळ पोलिसांचे ट्वीट येथे पाहा –

रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरु आहे.तरीही युक्रेनमधील चेर्नाबिल अणूभट्टी अपघात क्षेत्र, कंबोडीयातील किलींग फिल्ड्स, पोलंड येथील ऑशविट्झ कॅम्प, तसेच अमेरिकेतली 9/11 चा हल्ला झाला होता ते ग्राऊंड झिरो या ठिकाणांवर पर्यटकांना जायला नेहमीच आवडत असते. तेथे शेकडो लोक मेले तर तेथे आपण जाण्यामागे मानसशास्रीय कारण देखील देखील जबाबदार असते. ते दुर्देवी लोक बिचारे मेले आपण मात्र सुरक्षित आहोत ही एक भावना यामागे असते.

भूतकाळात रमणे

डार्क पर्यटनाची पहिली व्याख्या जॉन लेनन आणि माल्कम फॉली यांनी केली आहे. केव्हीन फॉक्स गॉथमची अलिकडील व्याख्या अधिक कल्पनेचा विस्तार करतेय..दु:ख, अत्याचार किंवा वेदना यांनी वैशिष्ट्येपूर्ण असलेल्या ठिकाणी लोकांची गर्दी होते. पर्यटक अशा ठिकाणाला भेट देऊन भूतकाळात रमण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना त्रास झाला त्यांना श्रद्धांजली देखील वाहायची असते. लेखकांनी प्रथम या घातक स्थळांचे वर्णनाने या पायंडा पाडला. लेखक पीजे ओरुरकेने 1988 मध्ये वारसॉ, मनागुआ आणि बेलफास्ट या प्रवासाचे वर्णन ‘नरकातील सुट्या’ असे केले होते. बाली या देशात मृत्यू आणि अंतिम संस्कार हे देखील पर्यटनाचे वस्तू बनली आहे. जेथे पर्यटन क्षेत्रातील व्यापारी कोणाचा मृत्यू झाला की पर्यटन व्हॅन आणि तिकीट विक्री सुरु असते