दिल्ली : सध्या देशात (Presidential election) राष्ट्रपतीपदाची निवडणुक होत आहे. राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद असून ज्या (Rashtrapati Bhavan) राष्ट्रपती भवनाचीही एक वेगळी ओळख आहे. कसे असते राष्ट्रपती भवन आणि काय आहे त्याचे वेगळेपण याची माहिती सर्वांनाच असणे गरजेचे आहे. देशाच्या (Delhi) राजधानीच्या ठिकाणी असलेल्या या राष्ट्रपती भवनातील नौकर ते बैठकीचा हॉल आणि खास पाहुण्यांसाठीची कशी असते सोय. याची सर्व माहिती या बातमीतून आपण जाणून घेणार आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी याच राष्ट्रपती भवनाचे रुपांतर हे सर्वात मोठ्या लोकशाहीच्या स्थायी संस्थेत झाले आहे. राष्ट्रपती भवन हे बाहेरुन जेवढे सुंदर दिसते तेवढेच वैशिष्ट्यपूर्ण ते आतमध्ये आहे. 340 खोल्या आणि त्यासाठी 45 लाख विट लागली आहे. हे जगातील सर्वात मोठ्या अशा लोकशाहीच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. तर पहिले हे ब्रिटिश व्हाइसरॉयचे अधिकृत निवासस्थान होते. ज्यावेळी भारताची राजधानी ही कलकत्याहून दिल्लीला हलविण्याचा निर्णय झाला तेव्हा हे बांधण्यात आले तर यासाठी 17 वर्षाचा कालावधी लागला होता. ही वास्तु एडविन लँडसीर ल्युटेन्स यांनी उभारली आहे.
सध्याचा जो दरबार हॉल आहे तो ब्रिटीश राजवटीत सिंहासन कक्ष म्हणून ओळखला जात होता. तर त्यामध्ये दोन सिंहासने होती. राष्ट्रपती भवनातील या दरबार हॉलमध्ये 33 मीटर उंचीवर 2 टन वजनाची झाडी लटकलेली आहे. आता याचे स्वरुप बदलण्यात आले आहे. केवळ सर्वसाधारण खुर्ची आहे, जी अध्यक्षांसाठी आहे. 5 व्या शतकातील गुप्त काळाशी संबंधित आशीर्वाद मुद्रेसह गौतम बुद्धांची एक मूर्ती आहे. या सभागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपतींच्या खुर्चीवरून एखादी रेषा आखल्यास ती थेट राजपथमार्गे दुसऱ्या टोकाला असलेल्या इंडिया गेटच्या मध्यभागी आढळते. राष्ट्रपती भवनातील सेंट्रलडोममुळे या भवनाची वेगळी ओळख आहे. हा घुमट चार कोर्टापासून 55 फूट उंच इमारतीच्या मुकुटासारखा आहे.
राष्ट्रपती भवनातील संगमरवरी या भव्य हॉलमध्ये किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचे पुतळे आहेत. तर माजी व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल यांची चित्रे आहेत.त्यावेळी राणीला चांदीचे सिंहासन असण्याचाही उपयोग झाला होता.
राष्ट्रपती भवनाच्या उत्तरेकडील ड्रॉइंग रूममध्ये इतर देशातील राष्ट्रप्रमुखांना भेटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच ड्रॉइंग रूममधील दोन फोटो हे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एकामध्ये 14 ऑगस्ट रोजी एस.एन.घोषाल यांचे सत्तांतर आणि ठाकूर सिंग यांच्या माध्यमातून पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरलचा शपथविधी अशी चित्रे आहेत.
राष्ट्रपती भवनामध्ये 104 लोक एकाच वेळी बसू शकतील असा एक हॉल आहे. पूर्वी या हॉलला स्टेट डायनिंग हॉल म्हणून ओळखले जात होते. पुढे त्याला बँक्वेट हॉल असे नाव पडले. या हॉलमधील भिंतीवर माजी अध्यक्षांचे फोटो लावले आहेत.
छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी पिवळ्या रंगाची ड्रॉइंग रूम वापरली जाते. एकाच मंत्र्याचा शपथविधी किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांचा शपथविधी याप्रमाणे अशा छोट्या राजकीय कार्यक्रमासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये ग्रे ड्रॉइंग रूमही आहे, जी पाहुण्यांच्या स्वागतासाठी वापरली जाते.
अशोका हॉलमध्ये सर्व प्रकारचे मोठे समारंभ होतात. तर त्याच्या छतावर केवळ देशाच्याच नव्हे, तर इतर देशांच्या सम्राटांच्याही मार्गांची झलक दिसते. छतावर अशोक हॉलच्या छताचे केंद्र, इराणी साम्राज्याचा सम्राट फतेह अली शाह याचे विशाल चित्र असून त्याभोवती 22 राजपुत्र शिकार करताना दिसतात.
राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन हे 15 एकरमध्ये उभारण्यात आले आहे, जे लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे .ही बाग तयार करण्यासाठी एडविन लुटियन्स यांनी पॅराडाईजच्या बागा, काश्मीरच्या मुघल गार्डन्स, तसेच भारत आणि प्राचीन इराणच्या मध्ययुगीन काळात बांधलेल्या राजे राजवाड्यांच्या बागांचा अभ्यास केला होता. या बागेत 1928 मध्ये वृक्षारोपनाचे काम सुरु झाले होते. हे काम तब्बल वर्षभर सुरु होते.