भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच देशाच्या फाळणीचा निर्णय घेण्यात आला होता. भारताला 15 ऑगस्ट 19947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती झाली.सुरुवातीपासूनच पाकिस्तान हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाले. मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरूच राहिला. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. दैनंदिन गरजांसाठी आणि छोट्या-छोट्या वस्तूंसाठी देखील इतर देशावर अवलंबून राहण्याची वेळ सध्या पाकिस्तानवर आहे. मात्र दुसरीकडे भारतानं स्वयंमपूर्णतेकडे मोठं पाऊल टालं आहे. आज अनेक वस्तुंची भारतातून निर्यात होते. मात्र अशा काही गोष्टी आहेत, ज्या आजही पाकिस्तानमधून भारतात येतात.पाकिस्तानमधून भारतात ज्या वस्तुंची आयात होते.
त्यात पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे काळं मीठ, काळ्या मिठाची मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.भारतामध्ये काळ्या मिठाचं उत्पदन खूप कमी प्रमाणात होतं, त्यामुळे भारत त्यासाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे. परंतु आता भारतामध्ये देखील काळ्या मिठाचं उत्पादन काही प्रमाणात होण्यास सुरुवात झाली असून, भारतानं याबाबत पाकिस्तानवरील अवलंबित्व काही प्रमाणत कमी केलं आहे.भारतामध्ये होणारे विविध धार्मिक कार्यक्रम,व्रतांमध्ये काळ्या मिठाची गरज असते. काळ्या मिठाला रॉक सॉल्ट नावानं देखील ओळखलं जातं.जेव्हा समुद्राचं खारं पाणी हे सोडियम क्लोराइडच्या रंगीत क्रिस्टलमध्ये रुपांतरी होतं,त्यापासून या काळ्या मिठाची निर्मिती केली जाते.पाकिस्तानमध्ये काळ मिठ हे दोन ते तीन रुपये किलोने विकलं जातं, मात्र भारतामध्ये त्याची किंमत 50 ते 60 रुपये किलो एवढी आहे.
काळ्या मिठाचा इतिहास
काळ्या मिठाला रॉक सॉल्ट असंही म्हटलं जातं.काळ मिठ हे खड्यांच्या स्वरुपात आढळून येत त्यामुळे त्याला रॉक सॉल्ट असं म्हणतात. काळ्या मिठाला हिंदीमध्ये सेंधा नमक असं म्हणतात. सिंधू नदीच्या परिसरात ते आढळून आल्यानं त्याचं नाव सिंधूवरून सेंधा नमक असं पडल्याचा इतिहास आहे.पाकिस्तानच्या झेलम प्रांतामध्ये काळ्या मिठाची सर्वाधिक निमिर्ती केली जाते.