TC आणि TT मध्ये नेमका फरक काय? हजारवेळा ट्रेनने प्रवास केला असेल पण नाही सांगता येणार

| Updated on: Jan 07, 2025 | 3:41 PM

तुम्ही रेल्वेने अनेकदा प्रवास करता, काही वेळा तुमचं तिकीट देखील चेक केलं जातं. मात्र तुम्हाला माहीत आहे का की तुमचं तिकीट कोण चेक करत टीसी की टीटी? जाणून घेऊयात फरक

TC आणि TT मध्ये नेमका फरक काय? हजारवेळा ट्रेनने प्रवास केला असेल पण नाही सांगता येणार
Follow us on

जगातलं सर्वात लांब रेल्वे नेटवर्क हे भारतामध्ये आहे, तुम्ही जेव्हा लांब पल्ल्याच्या प्रवासाचा विचार करता तेव्हा तुम्हाला रेल्वेशिवाय पर्याय नसतो. तुम्ही बसनं देखील प्रवास करू शकता मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास जेवढा आरामदायी असतो तेवढा बसचा प्रवास आरामदायी नसतो. रेल्वेचं तिकिट देखील बसपेक्षा कमी असते. दुसरीकडे तुम्ही विमानानं देखील प्रवास करू शकता मात्र विमानाचं भाडं प्रत्येकालाच परवडेल असं नाही. विमानाचं तिकीट रेल्वेच्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक असतं.

त्यामुळे भारताच्या जवळपास सर्वच मार्गावर धावणाऱ्या ट्रेनला प्रचंड गर्दी असते. साधारणपणे पंधरा दिवस ते एक महिला आधीच रेल्वेची तिकीटं बुक होतात. आता ऑनलाईन प्रणालीमुळे तिकीट बुक करणं अधिकच सोपं झालं आहे. तुम्ही जेव्हा ट्रेननं प्रवास करता तेव्हा तुमचं तिकीट देखील चेक होतं. तुमचं रेल्वे तिकीट चेक करण्याचा अधिकार हा टीसी आणि टीटीला असतो. मात्र तुम्हाला या दोन्हीमधला फरक माहिती आहे का? चला तर जाणून घेऊयात टीसी कोणाला म्हणायचं आणि टीटी कोणाला म्हणायचं

टीसी आणि टीटी मधला फरक 

टीसी आणि टीटीमध्ये फार काही फरक नसतो, दोघांचं काम देखील एकच असतं मात्र अधिकार वेगवेगळे असतात. टीसीला आपण तिकीट चेकर म्हणतो. टीसी कधीही तुमचं तिकीट तुम्ही ट्रेनच्या आत असताना चेक करू शकत नाही. तुम्ही जेव्हा प्लॅटफॉर्मवर उतरतात तेव्हा जो व्यक्ती तुमचं तिकीट चेक करतो त्याला टीसी असं म्हटलं जात.

टीटीला ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामीनर असं म्हटलं जातं. तुम्ही जेव्हा ट्रेननं प्रवास करता तेव्हा तुमचं ट्रेनमध्ये तिकीट चेक होतं. तेव्हा ते तिकीट टीसी चेक करत नाही तर ते तिकीट चेक करण्याचा अधिकार हा टीटीला असतो. प्रवासादरम्यान तुमचं तिकीट चेक करणं, तुमचा बर्थ योग्य आहे का नाही ते चेक करण्याची जबाबदारी ही टीटीची असते. दोघांनाही सारखीच सॅलरी मिळते.