whatsapp down | व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन ! नेमके कारण काय ? मेसेज पाठवण्यास नेटकऱ्यांना अडचणी

| Updated on: Oct 05, 2021 | 12:05 AM

whatsapp down | जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचं सर्व्हर डाऊन झालं आहे. युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी येत आहेत. व्हॉट्सअॅप सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

whatsapp down | व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन ! नेमके कारण काय ? मेसेज पाठवण्यास नेटकऱ्यांना अडचणी
WHATSAPP DOWN
Follow us on

मुंबई : जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचं सर्व्हर डाऊन झालं. युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी येत आहेत. व्हॉट्सअॅप सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

सर्व्हर अचानकपणे बंद, कारण अद्याप अस्पष्ट

जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार सोमवारी साधारणपणे रात्री 9 वाजल्यापासून जाणवत आहे.  व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.

फेसबुक, मेसेंजरही बंद, नेमक्या अडचणी काय?

व्हाट्सअॅपला नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नाहीयेत. त्याचबरोबर व्हाट्सअॅप स्टेटसही अपलोड होण्यास अडचण येत आहे. तर दुसरीकडे फेसबुक तसेच फेसुकच्या मालकीचे असलेले मेसेजिंग अॅप मेसेंजरसुद्धा डाऊन झाले आहे. कोणतेही संदेश जात किंवा येत नाहीयेत. संदेश वहनास अडचणी येत असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे ही अडचण नेमकी का येतेय, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. इन्स्टाग्रामचीही तीच स्थिती आहे.

ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड

व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर लोक ट्विट करत सर्वांना तशाच अडचणी येत आहेत का? अशी शंका विचारत आहेत. अवघ्या काही क्षणात ट्विटरवर या संदर्भात असंख्य ट्विट केले गेले आहेत.
इतर बातम्या :

WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! चॅट बबलचा लूक बदलणार, चॅटिंग एक्सपीरियन्स सुधारण्यावर भर

32MP सेल्फी कॅमेरावाला Samsung 5G फोन अर्ध्या किंमतीत, जाणून घ्या फोनची खासियत आणि ऑफर

व्हॉट्स अ‍ॅपने भारतात उचलले ‘हे’ मोठे पाऊल; युजर्सच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई