नवी दिल्लीः तंत्रज्ञानामुळे जगभरात अनेक नवनवे बदल होत आहेत. त्यातच सोशल मीडिया, मेसेंजर ॲपमुळे अनेकांना संपर्क साधणे, मत व्यक्त करणे एवढ्याच गोष्टी केल्या जात होत्या. त्यातीलच एक व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. जगभरातील लाखो लोक हे ॲप वापरतात. कोरोनाच्या काळात याचा वापर कोरोना लस प्रमाणपत्रे डाउनलोड करण्यासाठी किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठी केला जात होता. त्यामुळे आताच्या जगात हॉट्सअॅप हे संवादाचे एक आवश्यक साधन बनले आहे.
आता या व्हॉट्सॲपवर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करू शकणार आहात. MyGov चॅटबॉट वापरून, तुम्ही आवश्यक ती कागदपत्रे Digilocker वरून डाउनलोड करू शकणार आहात.
त्यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपवर ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे डाउनलोड करू शकता. यासाठी एकच अट आहे ती म्हणजे सर्व कागदपत्रे ही तुमच्या डिजिलॉकरमध्ये सेव्ह केलेली असली पाहिजेत.
ही सेवा वापरण्याआधी सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये 9013151515 हा मोबाईल नंबर सेव्ह करावा लागणार आह. हा नंबर तुम्हाला MyGov म्हणून सेव्ह करावा लागणार आहे.
त्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करून New Chat च्या पर्यायावर जाऊन येथे तुम्हाला MyGov सह चॅट विंडो उघडावी लागणार आहे.
सुरू करण्यापूर्वी तुम्ही हाय, डिजिलॉकर किंवा नमस्ते टाइप करून नवीन चॅट सुरू करू शकणार आहात. प्रथमच व्हॉट्सॲपवर डिजिलॉकरमध्ये प्रवेश करण्यासाठी, तुम्हाला आधारवरून प्रमाणीकरण पूर्ण करावे लागणार आहे.
चॅट सुरू केल्यानंतर तुम्हाला तेथे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर गरजेनुसार तुम्ही व्हॉट्सअॅपवर कोणतेही डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त पर्यायांमधून त्याची निवड करायची आहे.
तुम्ही व्हॉट्सॲपवर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), विमा पॉलिसी दस्तऐवज, कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
याशिवाय, तुम्ही सीबीएसई दहावीची मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि सीबीएसई बारावीची गुणपत्रिकाही डाउनलोड करू शकणार आहात.