मुंबईः व्हॉट्सअप (WhatsApp) सर्व्हर (Server Down) डाऊन झाल्यामुळे मेसेज जाण्याचा स्पीड (Speed) अत्यंत कमी झाला आहे. ऐन दिवाळीत व्हॉट्सअपचे मेसेज येणं-जाणं बंद झाल्यामुळे नेटकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुपारी 12.30 वाजेनंतर साधारण व्हॉट्सअपवरील मेसेजेच जाण्याचा स्पीड कमी झाला. सुरुवातीला अनेक ग्रुपवरील मेसेज जाणं आणि येणं बंद झालं. पावणे एक वाजेपर्यंत पर्सनल नंबर्सवर मेसेज जात होते. मात्र १ वाजेनंतर तेदेखील बंद झाले.
दिवाळीच्या सुट्या, दुपारची वेळ… व्हॉट्सअपवर आलेल्या शुभेच्छा आणि इतर संदेश वाचण्याच्या मनःस्थितीत असलेल्या नेटकऱ्यांसमोर यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला कुणाला वाटलं आपलंच इंटरनेट डाऊन असेल. अनेकांनी आपला इंटरनेट स्पीड आणि इंटरनेट कनेक्शन सुरु आहे की नाही, हे तपासून पाहिलं.
पण काही वेळाने खरा प्रॉब्लेम इंटरनेटला नसून व्हॉट्सअपला आहे हे काही वेळाने समजले.
व्हॉट्सअप बंद पडताच असंख्य लोक ट्विटरकडे वळालेत. ट्विटरवर क्रिएटिव्ह मेसेजचा सध्या पाऊस सुरु झाला आहे.
People Coming to Twitter to see if WhatsApp is down#WhatsappDown pic.twitter.com/eGi25KiQhU
— Bella Ciao (Chai) (@punjabiii_munda) October 25, 2022
ट्विटरकडे वळालेल्या लोकांना फक्त आपलंच व्हॉट्सअप बंद पडलेलं नाहीये, हे पाहून जरासं हायसं वाटलं….
When your WhatsApp is playing up but you come to Twitter and see that everyone else is having the same problem #WhatsAppDown pic.twitter.com/pMcJm0Zn56
— Jamie (@GingerPower_) October 25, 2022