MLA Raju Kage | रावण दहन होतानाच काँग्रेसचा आमदार अडकला वादात, मग घातले लोटांगण

| Updated on: Oct 25, 2023 | 5:12 PM

MLA Raju Kage | कर्नाटकमधील कागवाड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी परिचारीका, नर्सवर केलेल्या टिप्पणीने ते अडचणीत सापडले आहे. त्यांचे मते, रुग्णालयात सुंदर नर्स त्यांना आजोबा म्हणायची तेव्हा त्यांना वाईट वाटायचे. या टिप्पणीने ते चांगलेच अडचणीत सापडले. वादाचे वादळ घोंगावल्यावर त्यांनी झटपट माफी मागितली.

MLA Raju Kage | रावण दहन होतानाच काँग्रेसचा आमदार अडकला वादात, मग घातले लोटांगण
Follow us on

नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार राजू कागे, एका टिप्पणीमुळे चांगलेच अडचणीत आले. काहींना त्यांना म्हतारचळ झाल्याचा टोमणा हाणला. तर कोणी त्यांची शोभा काढली. कर्नाटकमध्ये चोहोबाजूंनी टिकेची झोड उठल्यावर कागे यांनी माफी माफत सारवासारव केली. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी केलेले विधान त्यांच्या अंगलट आले. सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल झाले. त्यानंतर 65 वर्षीय आमदार कागे यांनी जाहीर माफी मागावी लागली. माझा उद्देश कोणाच्या भावना दुखवण्याचा नव्हता. मी असे विधान करुन माझ्या म्हतारपणाचे दुःख वाटले, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, अशी सारवासारव त्यांनी केली.

कशामुळे पेटला वाद?

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार राजू कागे शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते. बेळगाव जिल्ह्यातील अमरखोडा येथे दसरा उत्सव आयोजीत करण्यात आला होता. रावण दहन होण्यापूर्वी एक सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होता. त्यात आमदार कागे यांनी बेछूट विधान केले. रुग्णालयात असताना तरुण नर्सेस त्यांना आजोबा म्हणायच्या तेव्हा फार दुःख व्हायचे, असे विधान त्यांनी केले. यकृत प्रत्यारोपणासाठी ते एक महिना रुग्णालयात होते. त्यावेळचा प्रसंग आठवून त्यांनी ही टिप्पणी केली होती. ही टिप्पणी करताच ते सोशल मीडियावर ट्रोल झाले.

हे सुद्धा वाचा

वाद वाढताच माफीनामा

राजू कागे यांनी वाद ओढावून घेतला. विरोधकांना आयतं कोलीत मिळालं. रावण दहनाच्या कार्यक्रमातच असे विधान केल्याने ते अडचणीत सापडले. वाद अंगलट येत असल्याचे कळताच कागे यांनी बिनशर्त माफीनामा सादर केला. त्यांनी माफीचा व्हिडिओच तयार केला आणि तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

मी वृद्ध झालो हेच सांगायचे होते


काँग्रेसचे नेते राजू कागे टिप्पणीमुळे अडचणीत आले. त्यांनी माफी मागितली. कोणच्या भावना दुखवायचा माझा हेतू नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. असे राजू कागे यांनी सांगितले. मी कोणत्या ही बंद खोलीत हे विधान केले नाही. तर सार्वजनिक ठिकाणी माझ्या मनातील भावना व्यक्त केला. त्यामागे मी आता वृद्ध झाल्याचे दुख व्यक्त केले, अशी सारवासारव त्यांनी केली. मी आपलं साधं बोलून गेलो, आता प्रत्येक जण त्यातून काहीही अर्थ काढू शकतो, असे ते म्हणाले.​