जेव्हा सिवन यांना ISRO ने नोकरी देण्यास दिला होता नकार, स्वत: सांगितला मजेशीर किस्सा

| Updated on: Oct 14, 2023 | 7:52 PM

गोवा एनआयटीच्या ( राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था ) दीक्षात समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना इस्रोचे माजी अध्यक्ष के.सिवन यांनी आपल्याला कसे इस्रोने नोकरीसाठी नकार दिला याचा किस्सा सांगितला.

जेव्हा सिवन यांना ISRO ने नोकरी देण्यास दिला होता नकार, स्वत: सांगितला मजेशीर किस्सा
k.sivan
Image Credit source: socialmedia
Follow us on

पणजी | 14 ऑक्टोबर 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ( ISRO) माजी अध्यक्ष के. सिवान यांना आपल्या करीयर संबंधी एक मजेशीर किस्सा शुक्रवारी एका कार्यक्रमात सांगून उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. त्यांनी सांगितले की त्यांना इस्रोच्या उपग्रह केंद्रात नोकरीसाठी कसा नकार मिळाला होता याची गोष्ट उपस्थितांना सांगितली. त्यांनी सांगितले की चंद्रयान-2 च्या अपयशाच्या दुसऱ्या दिवसानंतर चंद्रयान-3 ची योजना सुरु करण्यात आली होती.

गोवा एनआयटीच्या ( राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था ) दीक्षात समारंभाला संबोधित करताना इस्रोचे माजी अध्यक्ष के.सिवन यांनी सांगितले की तुम्ही चंद्रयान-2 चे अपयश पाहिले असेल परंतू आम्ही शांत बसलो नाही. आम्ही दुसऱ्याच दिवशी नव्या जोमाने चंद्रयान-3 ची योजना तयार केली. अपशयाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांनी या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याचे त्यांनी सांगितले.

उपग्रह केंद्रात नोकरी मिळाली नाही

के.सिवन यांनी यावेळी बोलताना सांगितले की आम्हाला चंद्रयान-2 मध्ये काय चूक झाल्याचे कळले तेव्हा त्या क्षणी दु:खी झालो. परंतू दुसऱ्या क्षणी तुम्हाला उठावे लागते. आज तुम्ही चंद्रयान-3 चे यश पाहू शकता, तो एक मोठा धडा आम्ही यातून शिकला. तुम्हाला कळायला हवे की अपयशातून कसे शिकायला हवे ते. सिवन पुढे म्हणाले की, वास्तविक मला स्कूल टीचर व्हायचे होते. त्यांनी सांगितले की त्यांना इस्रोच्या उपग्रह केंद्रात नोकरी हवी होती. परंतू मला तेथून चालते व्हा सांगत नकार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सिवन यांनी किस्सा सांगितला की, बीईनंतर मी नोकरी करण्याचा विचार केला, परंतू नोकरी मिळविले सोपे नव्हते. मला खरेतर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे होते. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मी इस्रोच्या सॅटेलाईट सेंटर येथे नोकरीसाठी गेलो. तर ते मला सांगितले गेले येथे तुमच्याासाठी नोकरी नाही. अखेरीस मी त्याच संस्थेत अध्यक्ष झालो. मला सॅटेलाईट सेंटरमध्ये नोकरी मिळाली नाही. परंतू रॉकेट सेंटरमध्ये नोकरी मिळाली.

इस्रोचे नेतृत्व असे मिळाले

सिवन पुढे म्हणाले की, ‘मला करीयरमध्ये जे हवे होते ते कधी मिळाले नाही. प्री युनिव्हर्सिटी कोर्स केल्यानंतर मला बीई इंजिनिअरींग करायचे होते. तर वडीलांनी पैसे नसल्याचे सांगत बीएससी करायला सांगितले. बीएससी केल्यानंतर एमएमसी करायचे होते, तेव्हा वडीलांनी आता तुला जे करायचे ते कर किंवा बीई कर असे म्हटले.’ सिवन पुढे म्हणाले की जीएसएलव्हीच्या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून मला मिळालेल्या यशाने आणि तेथे एक लीडर म्हणून घेतलेल्या साहसी निर्णयाने आपल्याला इस्रोचे सर्वात मोठे पद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.