नवी दिल्ली: सध्या कोरोना लसींच्या वाटपावरून केंद्र सरकार विरुद्ध असा वाद पेटलेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा (Covid vaccine) पुरवठा करावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मात्र, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला कशाबशा 17 लाख लसींचा साठा दिला. (Which state got how many covid vaccine doses and how many doses are wasted vaccination in Maharashtra Gujrat, UP, Delhi and Bihar)
त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकाच्या लसवाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले होते. महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिया रुग्णांची संख्या जास्त असतानाही तुलनेने कमी रुग्ण असलेल्या गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना कोरोना लसवाटपात केंद्र सरकार झुकते माप देत असल्याचा आरोप महाविकासआघाडी सरकारने केला होता.
महाविकासआघाडी सरकारच्या या आरोपाचा प्रतिवाद करताना केंदीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्राने लसी फुकट घालवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांचीच री ओढत महाराष्ट्र सरकारच कसे फोल ठरले आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. हर्षवर्धन हे फुकट गेलेल्या लसींची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवत आहेत, असा प्रत्यारोप केला होता. लसी फुकट जाण्याचे प्रमाण इतर राज्यांमध्ये कितीतरी अधिक आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले होते.
कोरोनाची लस देताना काही लसी फुकट जात आहेत. लसीची बाटली फुटणे, कोल्ड चेन तुटणे, एक्स्पायरी डेट संपणे, लस फोडल्यानंतर विशिष्ट वेळेत त्याचा वापर न होणे, अशा अनेक कारणांमुळे लसी फुकट जात आहेत. त्यावरुन सध्या बरेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
‘हिंदुस्थान टाईम्स’च्या माहितीनुसार, तामिळनाडू (12.4 टक्के), हरियाणा (10 टक्के) आणि बिहारमध्ये (8.1 टक्के) कोरोना लसींचा सर्वाधिक अपव्यय झाला आहे. तर दिल्ली (7 टक्के), आंध्र प्रदेश (7.3 टक्के), पंजाब (8 टक्के), आसाम (7.3 टक्के) आणि मणीपूरमध्ये 7.2 टक्के लसी फुकट गेल्या आहेत.
राज्य | आतापर्यंत किती लसी मिळाल्या? | आणखी किती लसी मिळणार? |
---|---|---|
आंध्र प्रदेश | 3,794,920 | 1,458,170 |
बिहार | 4,644,080 | 1,096,890 |
उत्तर प्रदेश | 9,209,330 | 4,798,450 |
उत्तराखंड | 1336,100 | |
ओदिसा | 4,344,140 | 200,000 |
मध्य प्रदेश | 5,819,530 | 3,376,220 |
महाराष्ट्र | 10,619,190 | 1,943,280 |
राजस्थान | 10,495,860 | 383,260 |
जम्मू-काश्मीर | 1,351,600 | 160,240 |
झारखंड | 2,474,340 | 2,047,610 |
पश्चिम बंगाल | 8,383340 | 2,105,970 |
छत्तीसगढ | 4,666,550 | |
दिल्ली | 2,370,710 | 200,000 |
गुजरात | 10,519,330 | |
पंजाब | 2,236,770 | |
आसाम | 1,781,080 | 818.740 |
कर्नाटक | 7,057,900 | 1377,560 |
हिमाचल प्रदेश | 1,116,990 | 193,160 |
हरियाणा | 3,042,220 | 1,992,150 |
केरळ | 5,606,790 | 974,710 |
तेलंगणा | 2 599,230 | 362280 |
चंदीगड | 180,930 | |
गोवा | 180,930 | |
तामिळनाडू | 5,428,950 | 221.440 |
संबंधित बातम्या:
(Which state got how many covid vaccine doses and how many doses are wasted vaccination in Maharashtra Gujrat, UP, Delhi and Bihar)