वाराणसी, चंदीगड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनीच्या आंघोळीचे व्हिडीओ प्रकरण ताजेच असताना तसाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाराणसीतील परेड कोठी येथील गेस्ट हाऊसमध्ये (Varanasi Gust House) विद्यार्थिनींचे कपडे (Student Changing Cloth) बदलतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद (Record Video In CCTV) झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या गटाने त्यांच्या खोलीत सीसीटीव्ही लावल्याचा आरोप केला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला व सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे प्रकरण थाना सिग्राच्या कँट भागात असलेल्या गेट्स हाऊसचे आहे, जिथे पश्चिम बंगालमधील एका संस्थेतील विद्यार्थिनी थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर काही तासांनी एकच गोंधळ उडाला. त्यांना थांबवण्यात आलेल्या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. विद्यार्थिनी त्या हॉलमध्ये कपडे बदलत असताना त्यांची नजर कॅमेऱ्यावर पडली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
एसीपी वरुणा झोन विकास श्रीवास्तव यांनी सांगितले की, गेस्ट हाऊस संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू आहे. जेपी गेस्ट हाऊसचे सीसीटीव्ही आणि डीव्हीआर जप्त करण्यात आले आहेत. कपडे बदलण्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्राप्त झालेली तक्रार योग्य असल्याचे आढळून आले आहे. मात्र ही बाब ज्या परिसरात उघडकीस आली त्या परिसरात अशी अनेक हॉटेल्स असून ती कोणत्याही परवान्याशिवाय सुरू आहे. या प्रश्नावर प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले असल्याने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.