ट्रेनमध्ये साईडवाली लोअर बर्थ कोणाला मिळते? काय आहे रेल्वेचा नियम ?

| Updated on: Sep 30, 2024 | 10:30 AM

लांबच्या प्रवासात ट्रेनमधून प्रवास करताना साईड लोअर बर्थला जास्त प्राधान्य प्रवासी देत असतात. लोअर बर्थचे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. कोणत्या वर्गाला लोअर सिट मिळते ते पाहूयात...

ट्रेनमध्ये साईडवाली लोअर बर्थ कोणाला मिळते? काय आहे रेल्वेचा नियम ?
Side lower berth
Follow us on

ट्रेनमधून जेव्हा आपल्याला लांबचा प्रवास करायचा असतो. तेव्हा आपण कोणती सिट निवडतो. कदाचित खालचा बर्थ सर्वांना हवा असतो. जेथे आपण आरामात बसू आणि उठू शकतो. परंतू  काही जण साईडवाली लोअर बर्थ निवडतात. कारण येथे प्रायव्हसी थोडी अधिक असते.  लांबचा प्रवास आरामात करायचा असेल तर लोअर बर्थच बरी असते. परंतू तुम्हाला IRCTC वर तिकीट बुक करताना लोअर बर्थची कशी मिळते हे माहिती आहे का? जर तुम्हाला लोअर बर्थ बुक करायची असेल तर काही सोपे नियम आहेत ते जाणून घ्या…

साईड लोअर बर्थ कशी मिळते ?

भारतीय रेल्वेत स्लीपर क्लास श्रेणीच्या डब्यात साईड लोअर बर्थ शक्यतो ज्येष्ठ नागरिकांना मिळते. या शिवाय या लोकांना देखील लोअर बर्थ मिळू शकते. उदा. जर तुमचे वय साठ वर्षांहून अधिक आहे, तर महिलांमध्ये 58 वर्षांपेक्षा जादा वयाच्या महिलांना लोअर बर्थ दिली जाते. प्रेग्नंट महिलांना तसेच शारिरीक रुपाने दिव्यांग व्यक्तींना लोअर बर्थ दिली जाते.

अपंगांना साईड लोअर सीट

रेल्वे बोर्डाच्या नियमांप्रमाणे स्लीपर क्लास मध्ये दिव्यांगासाठी चार सिट रिझर्व्ह असतात. यात दोन सिट खालच्या आणि दोन सीटमधल्या असतात.तर थर्ड एसीत दोन सिट आणि एसी 3 इकॉनॉमीत दोन सिट अपंगांसाठी आरक्षित असतात. गरीब रथ ट्रेनमध्ये दिव्यांगासाठी दोन खालच्या आणि दोन वरच्या सिट आरक्षित असतात. या सिटीसाठी दिव्यांगांना पूर्ण भाडे भरावे लागते.

60 वर्षांहून अधिक वयाच्या पुरुष आणि 45 वर्षांहून अधिक वयाच्या महिला प्रवाशांसाठी देखील लोअर बर्थ आरक्षित असते. प्रत्येक कोचमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी  काही आसने आरक्षित असतात.

गर्भवती महिलांसाठी आरक्षित सिट

जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिला लोअर बर्थ दिली जाते. जर कोणा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग वा गर्भवती महिलेला वरच्या सिटचे तिकीट दिले असेल तर ऑनबोर्ड तिकीट चेकींग दरम्यान त्यांना टीटी खालच्या बर्थवर जागा देऊ शकतात.

टीटी देऊ शकतात लोअर बर्थ

जर सिनियर सिटीझन, दिव्यांग, गर्भवती महिलांना तिकीट बुक करताना वरची बर्थ मिळाली असेल तर टीटी तिकीट तपासताना त्यांना खालची बर्थ देऊ शकतात. जर तुम्ही सिनियर सिटीझन नाहीत, तरीही तुम्हाला लोअर बर्थ हवा आहे तर तुम्ही आयआरसीटीसीच्या एपवरुन लोअर बर्थचे ऑप्शन दाबून सिट बुक करु शकता.